आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्रीन स्पेस’ निर्मितीसाठी पालिका लावणार तब्बल १५ हजार झाडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहराचे कमाल तापमान आणि दुसरीकडे वृक्षतोडीचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. यामुळे पालिकेने ‘ग्रीनस्पेस डेव्हलमेंट’साठी पंचवार्षिक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात जून ते जुलैदरम्यान तीन हजार, तर पुढे सलग चार वर्षे प्रत्येकी तीन हजार अशी पाच वर्षांत १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येईल. यामुळे शहराला ‘ग्रीनसिटी’चा लूक मिळले.
 
गेल्या पंचवार्षिक सत्ताकाळात तत्कालिन नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या कार्यकाळात वृक्षलागवडीचे उपक्रम राबवण्यात आले होते. यानंतर मात्र पालिकेने या महत्वपूर्ण विषयाकडे कानाडोळा केला. आता अमृत योजनेच्या ग्रीनस्पेस डेव्हलमेंट (हरितपट्टा विकास) आराखड्यानुसार पालिकेने वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. कोणत्याही हे नियोजन कृतीत उतरवण्यासाठी पंचवार्षिक आराखडादेखील तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यंदा पावसाळ्यात तीन हजार झाडांची लागवड होईल. 

शहरातील पालिका मालकीचे ओपन स्पेस, प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा जागा, विज तारांना स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी स्थानिक प्रजातीच्या रोपांची लागवड केली जाईल. दीपनगर औष्णिक केंद्रामुळे शहराचे कमाल तापमान झपाट्याने वाढते आहे. तापमान वाढीचा हा आलेख पाहता केवळ वृक्षलागवड हाच त्यावरील पर्याय आहे. यासाठीच पालिकेने हरितपट्टे विकसीत करण्याचे धोरण हाती घेतले आहे. त्यात केवळ वृक्षलागवडच नव्हे, तर वृक्षसंगोपनावर भर देण्यात येईल, अशी माहिती पालिकेने दिली. 
तांत्रिक मंजुरी मिळाल्याने येत्या पावसाळ्यात शहरात माेठ्या प्रमाणात वृक्षारोपण होईल. यासाठी पालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाच वर्षांत १५ हजार, तर यंदा त्यापैकी तीन हजार झाडे लावू, असे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
 
Ãपालिकेकडून होणाऱ्यावृक्षलागवडीमध्ये लोकसहभाग वाढवू. कमी उंचीची २० हजार झाडे लावण्यापेक्षा पाच ते सहा फूट उंचीची तीन हजार झाडे लावली जातील. यापूर्वीचा वृक्षलागवडीचा अनुशेष भरुन काढू. विशेष म्हणजे रोपांच्या संगोपणाची काळजी घेऊ. रमणभोळे, नगराध्यक्ष, भुसावळ 
 
बातम्या आणखी आहेत...