आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब पुरंदरे, कॉ. शरद पाटील संशोधक नसून विकृती; श्रीपाल सबनीस यांचा अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्माच्या भिंती ओलांडून स्वराज्यासाठी कार्य केले. मात्र, बाबासाहेब पुरंदरेंसारख्या काही ब्राह्मण विद्वानांनी शिवाजी महाराजांना मुस्लिमांविराेधात उभे केले, तर कॉ. शरद पाटील यांच्यासारख्या ब्राह्मणेतर विद्वानांनी त्यांना ब्राह्मणांच्या विरुद्ध उभे केले. या दोन्ही प्रवृत्ती संशोधन नसून विकृती अाहेत,’ असे वादग्रस्त वक्तव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत केले.
    
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित बहुजन, ब्राह्मण, दलित अादिवासी, ओबीसी भटके अल्पसंख्याक एकता संमेलनासाठी शहरात अाले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, काॅ. पानसरे यांच्या हत्येबाबत डॉ. सबनीस म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी भाजप असो की काँग्रेस, दोन्ही नालायकच आहेत.
 
एकाचा खून काँग्रेस, तर दुसऱ्यांचा खून भाजपच्या सत्तेच्या काळात झाला. मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागत नाही ही खेदाची बाब अाहे. अाराेपी शाेधणे ही पोलिस आणि सरकारची जबाबदारी आहे. मात्र, त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही. सध्या शेतकरी मरतोय आणि मारेकरी मुक्त फिरताहेत अशी राज्याची स्थिती आहे,’ असे सबनीस म्हणाले. 
 
संमेलनात राजकारण्यांचा वावर योग्यच
‘डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात राजकारणी अधिक होते, अशी टीका होते. मात्र, सत्ता आणि संघर्ष यांचाही संवाद हवा. साहित्यिकांमध्ये सध्या काय सुरू आहे आणि जनतेच्या भावना काय आहेत हे सत्ताधाऱ्यांना जाणून घेण्याची ती पर्वणी असते. (कै.) यशवंतराव चव्हाणांपासून साहित्य संमेलनात राजकारण्यांना आमंत्रण देण्याची पद्धत आहे. त्यामुळे राजकारण्यांचा वावर अधिक होता, अशी टीका संयुक्तिक नाही,’ असे सबनीस म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...