आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोजवम मारुततुल्यवेगम् जितेंद्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्, शहरातील विविध भागातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचमुखी हनुमान मंदिरात लावण्यात आलेला मारुतीचा पाळणा. - Divya Marathi
पंचमुखी हनुमान मंदिरात लावण्यात आलेला मारुतीचा पाळणा.
भुसावळ- हनुमान जयंतीनिमित्त शहरातील विविध भागातील मंदिरांमध्ये पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांचे अायोजन झाले. दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी कायम होती. 
राम मंदिर वॉर्डातील बडा हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले. यानिमित्त मंदिरावर आकर्षक राेषणाई करण्यात अाली अाहे. साेमवारी सकाळी सहा वाजेपासून जयंतीपर्यंत हनुमान चालिसा पठण करण्यात आले. गाेविंद अग्रवाल, सुरेश शर्मा, रविंद्र पुराेहित, श्रीकांत नागला, चिंटू झवर, याेगेश अग्रवाल सहभागी झाले. मंगळवारी सकाळी हनुमानाची सहस्त्रनाम पूजा सहस्त्रधारा अभिषेक झाला. पहाटे ३.३० वाजेपासून हनुमानाच्या मुर्तीला दूध, दही, मध, तूप, साखर, अत्तर, दशमूळ, उसाचा रस, गंगाजल यांचा महाभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रांग लागली होती. प्रशांत वैष्णव यांच्यासह अन्य भाविकांनी सहकार्य केले. 
 
दर्शनासाठी रांगा : बसस्थानक मार्गावरील मंदिर, हनुमाननगर, आनंदनगर, नेब कॉलनीसह अन्य भागातील हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी गर्दी आणखी वाढली. तापी काठावरील संकटमोचन हनुमान मंदिरातही दिवसा तसेच सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. आकर्षक रोषणाई करण्यात आली. 
 
आज होणार भंडारा खिचडी वाटप 
दशमेश मार्गावरील पंचमुखी हनुमान मंदिरावरदेखील जयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडीचा प्रसाद वितरित करण्यात आला. सायंकाळी मंदिरात भजनांचा कार्यक्रम झाला. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. 
 
बडा हनुमान मंदिरापासून मंगळवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक मार्गस्थ झाली. तसेच बुधवारी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. 
बातम्या आणखी आहेत...