आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलस्वाराला चिरडले; संतप्त जमावाचा कंटेनर पेटविण्याचा प्रयत्न, राष्ट्रीय महामार्गावरील अंधाराने घेतला बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कामावरून घराकडे सायकलने जाणाऱ्या मजुराला कंटेनरने चिरडल्याची घटना साेमवारी सायंकाळी वाजता ट्रान्सपाेर्टनगर परिसरातील हाॅटेल प्रीतम पार्कसमाेर घडली. यावेळी संतप्त जमावाने कंटेनर पेटवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने जमाव शांत झाला. एमअायडीसी पाेलिसांनी कंटेनर ताब्यात घेऊन चालकाला अटक केली अाहे. दरम्यान, महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर अंधार हाेता. त्यामुळे हा अपघात घडल्याचे बाेलले जात अाहे. 
 
खुबानगरातील सादिक खान बशीर खान (वय ४०) हे अाॅटाेनगरातील कासम पेंटर यांच्या दुकानात काम करीत हाेते. साेमवारी सायंकाळी ६.४५ वाजता ते दुकानातून घराकडे जाण्यासाठी सायकलने निघाले हाेते. ट्रान्सपाेर्टनगर परिसरातील हाॅटेल प्रीतम पार्क समाेर सायंकाळी वाजता मागून येणाऱ्या भरधाव कंटेनर (क्रमांक एमएच- ०६, एक्यू- २६४७)ने त्यांना धडक दिली. त्यामुळे ते कंटेनरच्या चाकाखाली सापडून चिरडले गेल्याने जागीच ठार झाले.
 
अपघात झाल्याचे कळताच सादिक खान यांच्या नातेवाइकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली हाेती. सादिक यांच्या पश्चात मुसद्दीक (वय १३), साहील (वय १०) ही दाेन मुले, पत्नी, अाणि चार भाऊ असा परिवार अाहे. दरम्यान, खेडीपासून खाेटेनगरपर्यंत पथदिवे लावलेले अाहेत. मात्र, अनेक दिवे वर्षभरापासून बंद असल्याने महामार्गावर अंधार असताे.
 
कंटेनर चालकाला पाेलिसांनी केली अटक 
भुसावळ येथून रेल्वेने अालेल्या प्लास्टिक दाण्यांचा कंटेनर घेऊन पुरुषाेत्तम विश्वनाथ काेळी (वय ३५, रा. किनाेद) हा साेमवारी सायंकाळी वाजता निघाला हाेता. पाळधी येथील जैन इरिगेशन कंपनीत त्याला माल पाेहाेचवायचा हाेता. मात्र, सायंकाळी वाजता अपघात झाल्यानंतर कंटेनरचालक पुरुषाेत्तम काेळी कंटेनर साेडून पसार झाला. काही वेळाने ताे एमअायडीसी पाेलिस ठाण्यात हजर झाला. त्याला पाेलिसांनी अटक केली असून कंटेनरही ताब्यात घेतला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...