आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेटारसायकल अपघातात बाळापूरचे दाेन युवक जागीच ठार; एक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - सुरत - नागपूर महामार्गावर बाळापूर शवारात ट्रिपलसीट येणाऱ्या माेटारसायकलला समाेरून येणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात बाळापूर येथील दाेन युवक जागीच ठार तर एक जण जखमी झाला. त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. 
 
धुळे तालुक्यातील बाळापूर येथील समित शिरीष वाघ (वय २०) हा धुळे येथे क्लाससाठी येत असताना त्याला बाळापूरफाटा येथे नकुल विनायक मिस्तरी (वय १८, रा. बाळापूर) अाणि हर्षल उर्फ सनी संजय पाटील (वय २१, रा. बाळापूर) हे दाेघे भेटले. त्यांनाही धुळे येथे जायचे असल्याने तिघे जण एकाच माेटारसायकलने (एमएच १५-इव्ही ३२३१) धुळ याकडे येत होते. बाळापूरपासून एक किलाेमीटर अंतरावर त्यांच्या माेटारसायकलला समाेरून जळगावकडे जाणाऱ्या इंडिका कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार हाेती की तिघे दुचाकीसह फेकले गेले. त्याचवेळी दुचाकीच्या मागून डांबराचे ड्रम घेऊन जाणारा टाटा ४०७ मिनीट्रक येत हाेता. अचानक दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने चालकाने ब्रेक लावला. त्यामुळे मिनीट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात माेटारसायकलवरील नकुल मिस्तरी हर्षल पाटील जागीच ठार झाले तर समित वाघ हा जखमी झाला. त्याने माेबाइलवरून अपघाताची माहिती दिल्यानंतर बाळापूर येथील काही युवकांनी समित वाघला रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर धडक देणारी इंडिका कार निघून गेली. तालुका पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक घुमावत इतर कर्मचाऱ्यांनी वाहतूक काेंडी सोडवली. दोघांवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...