आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळनेर: पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी केली गॅलरीतच अन्न-पाण्याची साेय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपळनेर - उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, उन्हाचे प्रमाण वाढायला लागले अाहे. त्याचा परिणाम पक्ष्यांवरही हाेताना दिसताे. त्यामुळे चिमण्या इतर पक्ष्यांसाठी येथील अादर्श काॅलनीत प्रत्येकाने अादर्श घ्यावा, असा उपक्रम राबवण्यात अाला अाहे. या ठिकाणी पक्ष्यांना खाद्य पाणी मिळावे यासाठी व्यवस्था करण्यात अाली अाहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. 
 
येथील अादर्श काॅलनीत पक्ष्यांसाठी ज्वारी तसेच बाजरीचे दाणे ठेवण्याची विशिष्ट व्यवस्था करण्यात अाली अाहे. नववीत शिकणाऱ्या सौरभ बेनुस्कर या विद्यार्थ्याने घरामागील गॅलरीत ही सोय केली आहे. पक्ष्यांना उन्हापासून दिलासा मिळावा तसेच त्यांची तृष्णा भागावी यासाठी या ठिकाणी रिकामी बाटली, लहान प्लास्टिकच्या बादलीत पाणी ठेवले. त्याचबरोबर प्लास्टिकच्या वाटीत धान्य ठेवण्यात आले आहे. त्यात बाजरी, तांदळाचा समावेश आहे. या ठिकाणी दुपारच्या वेळी अनेक पक्षी येतात. साैरभकडून प्रेरणा घेत पक्षीप्रेमी गणेश सूर्यवंशी यानेही सुभाष चौकात गच्चीवर पक्ष्यांसाठी निवारे उभारले. या ठिकाणीही ज्वारी, बाजरी, तांदूळ, चारा तसेच पिण्याचे पाणी ठेवण्यात आले आहे. या अभियानाला नागरिकांनीही हातभार लावला आहे.
 
पावसाळ्यापर्यंत या पक्ष्यांना या ठिकाणी पाणी खाद्य टाकण्यात येणार असल्याची माहिती
देण्यात आली. 
 
उन्हाळ्यात पाण्याअभावी पक्ष्यांचा जीव कासावीस होतो. काहीवेळा पाणी मिळाल्याने पक्ष्यांचा मृत्यूही होतो. त्यामुळे प्रत्येकाने घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पाणी धान्य ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 
 
पक्षीही पाहायला मिळतात 
या उपक्रमामुळे चिमणी, कावळा, कबुतर, बगळा इत्यादी पक्ष्यांसह अनेक दुर्मीळ पक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे आनंद द्विगुणित होतो. प्रत्येकाने पक्ष्यांसाठी छतावर पाणी ठेवावे. -सौरभ बेनुस्कर, पक्षीप्रेमी विद्यार्थी 
 
पक्ष्यांना मिळताे अासरा 
- उन्हाळ्यात अनेकदापाणी मिळत नाही. पक्षीही तहानलेले असतात. त्यांना खाद्य लागते. मात्र ते मुके असल्याने सांगू शकत नाही. त्यांची भाषा अापणच समजून घेऊन मदत केली पाहिजे. या भावना लक्षात घेऊन हा उपक्रम राबवला आहे.
-गणेश सूर्यवंशी, पक्षीप्रेमी विद्यार्थी, पिंपळनेर 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, पक्ष्यांना मिळणार जीवनदान...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...