आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपसमाेर अाघाडीचे अाव्हान; मंत्री गिरीश महाजनांची कसाेटी (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर- सत्ताधारी भाजप आणि गिरीश महाजन यांना मिळालेले मंत्रिपद पाहता जामनेर तालुक्यात आज भाजपची स्थिती भक्कम दिसत आहे. तुलनेत विरोधक कमकुवत दिसत असले तरी भाजपसाठी जिल्हा परिषद निवडणूक साेपी नाही.
 
त्यात तालुक्यातील सर्व सातही गट ताब्यात घेण्याचे मंत्री महाजन यांचे स्वप्न असले तरी अंतर्गत नाराजी काही गटांतील प्रबळ विरोधी उमेदवार पाहता ही निवडणूक एकतर्फी मुळीच नाही. कारण काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडीने कडवे अाव्हान उभे केले अाहे. निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार सुरू हाेण्यापूर्वीच मंत्री महाजन यांनी तालुक्यात सहा मेळावे घेतले अाहेत. 
 
जामनेर तालुक्यातील सातपैकी नेरी-पळासखेडा, वाघारी-बेटावद हे दोन गट अन्य गटांच्या तुलनेत भाजपसाठी पूरक दिसत आहेत. तर फत्तेपूर-तोंडापूर, पहूर-वाकोद लोंढ्री-पाळधी या गटात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. शहापूर-देऊळगाव गटात स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार, अशी लढत असून पंचायत समिती गणाच्या उमेदवारांवर गटासाठी निवडणूक लढत असलेल्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.
 
 शेंदुर्णी-नाचणखेडा गटात सरोजनी संजय गरुड यांच्या विरोधात गरुड कुटुंबातील उमेदवार देण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. त्यात तालुक्यातील सर्वाधिक गटबाजी शेंदुर्णीत असल्याने हा गट ताब्यात घेण्याचे मंत्री महाजन यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता कमीच आहे. हे उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच जवळपास स्पष्ट झाले आहे.
 
त्यातही फत्तेपूर-तोंडापूर गट महिलांसाठी राखीव असून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विजया डिगंबर पाटील तर भाजपतर्फे रजनी जगन्नाथ चव्हाण यांच्यात चुरशीची लढत हाेणार हे निश्चित. 
 
महिला लढत असल्या तरी डी.के.विरुद्ध जे.के.अशीच ही लढत होत दोघांच्या अस्तित्वाची ही निवडणूक ठरणार आहे. सेवानिवृत्त उपअभियंता जे.के.चव्हाण हे मंत्री गिरीश महाजन यांच्या सर्वात जवळच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. तर मंत्री महाजन यांच्याविरोधात २५ वर्षांपासून विविध निवडणुका लढवून विरोधकांचे अस्तित्व टिकवून असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी डिगंबर पाटील हे एक नेते आहेत. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने खचून गेलेल्या डिगंबर पाटील यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला होता.
 
मात्र, भाजपला शह द्यायचा असेल तर डी.के.पाटीलच उमेदवार असावे, असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने पुन्हा एकदा डी.के.पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. डी.के.विरुद्ध जे.के.अशी ही लढत संपूर्ण जिल्ह्यासाठी लक्षवेधी ठरणार आहे. 
 
चर्चेतील तीन मुद्दे असे 
- तालुक्यात पाळधी-लोंढ्री गटात उमेदवारीवरून झालेली नाराजी. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य समाधान पाटील यांच्याबद्दल कार्यकर्त्यांची नाराजी गटबाजी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. 
 
- नेरी -पळासखेडा गटात जि.प.चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य दिलीप खोडपे यांच्या पत्नी विद्या खोडपे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी उमेदवारी करता एक पाऊल मागे घेतले, ही बाब विशेष. 
 
- माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यासह समर्थकांशिवाय होत असलेली पहिलीच निवडणूक अाहे. अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा हवेत विरली. 
 
बातम्या आणखी आहेत...