आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या मेळाव्यात अन्नाची नासाडी, परिसरात ठिकठिकाणी दिसून आली पाकिटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- डाळीचे दर गगनाला भिडले अाहेत. अन्नधान्य महाग हाेत अाहे. याची राज्य सरकारला चिंता नाही. तशाच प्रकारचे अशाेभनीय वर्तन कार्यकर्त्यांकडूनही घडताना दिसते. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यादरम्यान कार्यकर्त्यांनी माेठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी केल्याचे पुढे अाले. मेळाव्याला उशीर झाल्यामुळे कार्यकर्त्यांसाठी पक्षाने पुरी-भाजीच्या पाकिटांची व्यवस्था केली. मात्र, पाेटभर खाण्यापेक्षा अर्धवट अन्न खाऊन उरलेले अन्न परिसरातच फेकल्याचे दिसून अाले. अनेक कार्यकर्त्यांनी पार्सलमधील एक-दाेन पुरी खाल्ल्यानंतर पुरीसह भाजी त्याच ठिकाणी फेकून दिले. काहींनी या अावारात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या जाळीवरच उरलेल्या पुऱ्या अाणि भाजी फेकून दिल्याचे दिसून अाले. पार्सलसाठी वापरण्यात अालेल्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगही फेकल्याने या ठिकाणी फेकलेले अन्न अाणि कॅरीबॅगचा कचरा पडलेला दिसून अाला.