आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: भुसावळात भाजपला फटका, पंचायत समितीत भाजपने सिद्ध केले वर्चस्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतमोजणीदरम्यान यावल रोडवर अशी गर्दी झाली होती. - Divya Marathi
मतमोजणीदरम्यान यावल रोडवर अशी गर्दी झाली होती.
भुसावळ - पालिका निवडणुकीत विजयरथावर स्वार झालेल्या भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत फटका बसला. तालुक्यातील तीनपैकी केवळ एक जागा मिळवण्यात भाजपला यश आले. तर पंचायत समितीतील सहापैकी चार जागा मिळवून पंचायत समितीत सत्ता कायम राखल्याने भाजपला दिलासा मिळाला. 
 
कुऱ्हा-वराडसिम गटात विजय मिळवणाऱ्या पल्लवी सावकारे भाजपच्या जिल्हा परिषदेच्या एकमेव विजयी उमेदवार ठरल्या. मात्र, पंचायत समितीवर वर्चस्व मिळाल्याने भाजप पदािधकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिल्हा परिषदेचे तीन गट पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरुवारी (दि.२३)मतमोजणी झाली. यावल राेडवरील शासकीय गाेदामात सकाळी १० वाजता मतमाेजणीला सुरुवात झाली. सर्वप्रथम पाेस्टल मते मोजण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ.श्रीकुमार चिंचकर, सहायक अधिकारी मीनाक्षी राठाेड, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांच्या उपस्थितीत स्ट्राँगरूमचे सील तोडून कुलूप उघडण्यात आले. उमेदवारांसह प्रतिनिधी मतमाेजणीच्या हाॅलमध्ये उपस्थित हाेते. 
पंचायतसमितीत यांचा विजय : पहिलानिकाल ११ वाजता लागला. साकेगाव गण : भाजपच्या प्रीती मुकेश पाटील (३४३६) यांनी राष्ट्रवादीच्या शहनाजबानाे रईसखान लाेधी (२४७७), शिवसेनेच्या सुरेखा हिरामण पाटील (२४५१) यांचा पराभव केला. हतनूर गण : भाजपच्या उमेदवार वंदना सदानंद उन्हाळे (४०१७) यांनी शिवसेनेचे संताेष दाेधू साेनवणे (३९५४) बसपाचे सुनील शांताराम पवार (६६८), काँग्रेसच्या अलका राजीव भिल्ल (५७३)यांचा पराभव केला. कंडारी गण : राष्ट्रवादीच्या अाशा संताेष निसाळकर (२७५६) यांनी भाजपच्या चेतना झाेपे (२४८९)आणि सविता माेरे (१४३६) यांना पराभूत केले. वराडसिम गणात भाजपच्या मनीषा भालचंद्र पाटील (४३५३) यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री सुभाष पाटील यांना (३२५३) पराभूत केले. कुऱ्हे (पानाचे) गणातून भाजपचे सुनील श्रीधर महाजन (४२००) यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाष पाटील (३३०२), शिवसेनेचे साेपान भारंबे (१४९९) नारायण सपकाळे (१७५९) यांचा पराभव केला. तळवेल गणातून शिवसेनेचे उमेदवार विजय सुरवाडे (३५८०) यांनी भाजपचे सुधाकर सुरवाडे (३४५०), काँॅग्रेसचे शैलेश बाेदडे (६९७), अपक्ष उल्हास भारसके (१२४०) यांचा पराभव केला. या गणात प्रा.उत्तम सुरवाडे यांना (९८) तर शैलेंद्र साेनवणे यांना (१५७) अशी अल्प मते मिळाली. 

 
 
बातम्या आणखी आहेत...