आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे तिकीट कापले, जि.प.साठी 499 अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव - जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचे हाेमपिच असलेल्या जामनेर तालुक्यात भाजपने जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा प्रयाग काेळी यांना उमेदवारी नाकारली अाहे. जामनेर तालुक्यातील सातपैकी सहा गट महिला राखीव असल्याने खुल्या असलेल्या पहूूर गटात प्रचंड चुरस निर्माण झाली अाहे. 
 
शेंदुर्णी गटात राष्ट्रवादीचे संजय गरुड यांच्या भाऊबंदकीतील उमेदवार देण्याची रणनीती भाजपने अाखली हाेती. मात्र, त्यात यश अाल्याने एेनवेळी भाजपने या गटात बेबीबाई तुकाराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने प्रस्थापितांच्या भुवया उंचावल्या. एवढेच नव्हे तर जामनेर पंचायत समितीचे सभापती अारती लाेखंडे यांनाही उमेदवारी नाकारण्यात अाली.
 
 जळगाव तालुक्यातील म्हसावद बाेरनार गटात शिवसेनेतर्फे पवन साेनवणे यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांची लढत भाजपतर्फे निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या माताेश्री लिलाबाई साेनवणे यांच्याशी हाेणार अाहे. म्हणजे या ठिकाणी अाई-मुलगा अशी लढत हाेणार अाहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी-बांभाेरी गटात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपूत्र प्रताप पाटील यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी दाखल केली. 
 
राष्ट्रवादीने येथे रमेश पाटील यांना उमेदवारी दिली. साेनवद-पिंप्री गटात भाजपतर्फे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील, शिवसेनेकडून गाेपाळ चाैधरी, राष्ट्रवादीकडून अविनाश पवार यांनी उमेदवारी दाखल केली. साळवा-बांभाेरी गटात भाजपतर्फे भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदेंच्या साैभाग्यवती माधुरी अत्तरदे, राष्ट्रवादीकडून उषा गाेपाळ पाटील, सेनेकडून अनिता प्रमाेद पाटील यांनी उमेदवारी दाखल केली.
 
 भुसावळ तालुक्यात कुऱ्हा-वराडसिम गटात भाजपने अामदार संजय सावकारे यांच्या वहिनी पल्लवी प्रमाेद सावकारे यांना रिंगणात उतरवले. चाेपडा तालुक्यात लासूर-घाेडगाव गटात राष्ट्रवादीने माजी अामदार प्रा. दिलीप साेनवणे यांचे सुपूत्र चेतन साेनवणेंना डावलून लासूरचे अनिल वाघ यांना उमेदवारी दिली. या तालुक्यात शिवसेनेने माजी अामदार कैलास पाटील समर्थकांची तिकिटे कापली गेली. शिवसेनेच्या उमेदवारी वाटपात अामदार प्रा. चंद्रकांत साेनवणेंचा वरचष्मा दिसून अाला. 
 
इंदिराताई पाटील रिंगणाबाहेर 
पाराेळा तालुक्यातील मंगरुळ-शिरसमणी गटात राष्ट्रवादीतर्फे माजी खासदार वसंतराव माेरेंचे सुपूत्र पराग माेरे रिंगणात अाहेत. देवगाव-तामसवाडी गटात शिवसेनेचे माजी अामदार चिमणराव पाटील यांचे पुतणे समीर वसंतराव पाटील, राष्ट्रवादीचे अामदार डाॅ. सतीश पाटील यांचे सुपूत्र राेहन पाटील यांच्यात ‘बिग फाइट’ रंगण्याची चिन्हे अाहेत. चाेपड्यात शिवसेनेच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या तथा महिला अाघाडी जिल्हाप्रमुख इंदिराताई पाटील यांनी गटबाजीमुळे उमेदवारीच दाखल केली नाही. 
 
जळगाव जिल्हापरिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६७ गटांसाठी एकूण ४९९ तर पंचायत समितीच्या १३४ गणांसाठी ९५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी जिल्हा परिषद गटांसाठी ४०६ तर पंचायत समिती गणांसाठी ८१३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...