आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैसे घेऊन माेठ्या रकमेचे चेक देणारे सामान्य खातेदार चाैकशीच्या रडारवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - काळापैसा व्यवहारात अाणण्यासाठी अनेक व्यापारी, व्हाइट काॅलर लाेकांनी कामावरील व्यक्ती, अाेळखीतील ग्राहकांना ‘बळीचे बकरे’ बनविले अाहेत. त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडून माेठ्या रकमेचे चेक घेतले अाहे. अातापर्यंत फारशा वापरात नसलेल्या खात्यात पैसे जमा करून व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी त्यांच्या फर्मच्या नावे माेठ्या रकमेचे चेक घेतले अाहेत. असे सामान्य खातेदार अायकर विभागातील चाैकशीच्या रडारवर असून, बँकांकडून या खात्यांची माहिती मागविली जात अाहे.
चाैथा शनिवार अाणि रविवार अशा सलग दाेन सुट्यांमुळे पैसे काढण्याची पंचाईत झालेल्या नागरिकांना एटीएमचा अाधार वाटत हाेता. पैसे काढण्यासाठी सुरू असलेले एटीएम शाेधताना अनेक जण गावाला वळसा घालून परत येत हाेते. रविवारी अनेकांची बंद एटीएमने निराशा केली. दाेन हजार रुपयांच्या नाेटमुळे निर्माण झालेली समस्या सुटण्यासाठी जळगावात अद्यापही ५०० रुपयांच्या नाेटेची प्रतीक्षाच अाहे. व्यवहारात लाेकांपर्यंत ही नाेट पाेहाेचली असली तरी, बंॅकांमधून ५०० रुपयांची नाेट मिळवण्यासाठी ग्राहकांना अाणखी प्रतीक्षा करावी लागणार अाहे.

दाेन दिवसांच्या सुट्यांमुळे अापापले एटीएम सुरू ठेवावे. त्यातील कॅशसंदर्भात सर्व गाेष्टींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना बंॅकांना देण्यात अाल्या हाेत्या. मात्र, अनेक बंॅकांचे एटीएम बंदच हाेते. काही एटीएममध्ये केवळ २००० रुपयांची नाेट हाेती. स्टेट बंॅक अाॅफ इंडिया, सेंट्रल बंॅक, अॅक्सिस, एचडीएफसी बंॅकेचे एटीएम सुरू हाेते. काही बंॅकांच्या एटीएममधील कॅश संपल्यानंतर ती लवकर रिफिल करण्यात अाली नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल झालेत. बँकानी ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी होत आहे.

शहरात बँकांमधून अद्याप ५०० ची नवीन नोट वितरित झाली नाही. मात्र, रविवारी सिव्हिलमध्ये रुग्णास भेटण्यास आलेल्या मध्य प्रदेशातील अफजल अब्दुल काकर यांच्याकडे ५०० ची नोट पाहून अनेकांनी कुतुहलाने ती हाताळली.

जळगाव जिल्ह्याशेजारील मध्य प्रदेश, गुजरातसह नाशिक येथून शहरात ५०० रुपयांच्या नाेटा व्यवहारात अाल्या अाहेत. जळगावच्या व्यवहारात ५०० रुपयांची नाेट पाेहाेचली असली तरी, बंॅका अाणि एटीएममधून मात्र ५०० रुपयांची नाेट मिळत नसल्याची स्थिती अाहे. नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर ही नाेट शहरात येणार असल्याची चर्चा हाेती. रविवारी शहरातील काेणत्याच एटीएममध्ये ५०० रुपयांची नाेट पाेहाेचलेली नव्हती. इतर बंॅकांना कॅश उपलब्ध करून देणाऱ्या स्टेट बंॅकेतही ५०० रुपयांची नाेट पाेहाेचलेली नसल्याची माहिती स्टेट बंॅकेच्या मुख्य शाखेचे सहायक महाप्रबंधक उदय पानसे यांनी दिली. त्यामुळे जळगावकरांना बंॅकेतून ५०० रुपये काढण्यासाठी अाणखी प्रतीक्षा करावी लागणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...