आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकावे ते नवलच... अंत्यसंस्कारानंतर स्मशानातून राख आणि अस्थींची चोरी, जाहीर वाच्यताही नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१८ एप्रिलच्या अस्थी विसर्जनापूर्वीच अस्थी राख गायब आहे. - Divya Marathi
१८ एप्रिलच्या अस्थी विसर्जनापूर्वीच अस्थी राख गायब आहे.
भुसावळ - तापीनदीकाठावरील हिंदू स्मशानभूमीत गेल्या महिनाभरापासून मृतदेहांवर अंत्यसंस्कारांनंतर राखेसह अस्थी गायब (चोरी) केल्या जात आहेत. महिनाभरात किमान सहा ते सात प्रकार घडल्यानंतरही या प्रकाराची जाहीर वाच्यता टाळली जात आहे. 

शहरातील तापी नदीकाठावरील हिंदू स्मशानभूमीत अनेक समस्या आहेत. स्मशानभूमीतील अंतर्गत भागातील रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आदींबाबत पालिका प्रशासनाकडून उपाययाेजना होत नाहीत. गेल्या महिनाभरापासून तर मृतदेहावर अंत्यसंस्कारांनंतर राख आणि अस्थी गायब होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. गेल्या महिनाभरात किमान सहा ते सात मृतदेहांची राख आणि अस्थी गायब झाल्या. हिंदू रूढी-परंपरेनुसार अग्निसंस्कारांनंतर तिसऱ्या दिवशी राख आणि अस्थी जमा करून त्यांचे विधिवत विसर्जन केले जाते. मात्र, अस्थी राख जमा करण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांना अंत्यसंस्कार केलेल्या जागेवर काहीही आढळत नाही. यामुळे नातेवाइकांच्या संतापाचा पारा वाढतो. मात्र, अस्थी गायब झाल्याची चर्चा समाजात होऊ नये, या बदनामीच्या भीतीपोटी या प्रकाराची जाहीर वाच्यता होत नाही. पालिकेने स्मशानभूमीत वॉचमनची सुविधा दिली आहे. यानंतरदेखील अस्थी राख गायब होत असल्याने कुंपणच शेत खात असल्याची कुजबुज सुरू आहे. स्मशानभूमीत रात्री पथदिवे सुरू नसतात. यामुळे चोरट्यांचे फावले आहे. पालिकेने या गंभीर प्रश्नी किमान नागरिकांच्या भावनांची दखल घेत रात्री स्मशानभूमीत दोन ते तीन वॉचमनची नियुक्ती करावी, अशी मागणी पुढे आली आहे. 
 
दखल घेणार 
- स्मशानभूमीतून अस्थीचोरीस जात असल्याची तक्रार अद्याप पालिकेकडे आलेली नाही. यासंदर्भात आम्ही वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन चौकशी करू. स्मशानभूमीत वाॅचमनची संख्या वाढवण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ.
- रमणभोळे, नगराध्यक्ष, भुसावळ 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...