आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर तालुक्यातील दानशूर लोकांच्यासहभागातून बोहरे शाळा झाली डिजिटल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोहरा जि प शाळेत मार्गदर्शन करताना  गटशिक्षणाधिकारी ए डी पाटील सोबत शिक्षणविस्तार अधिकारी पी डी धनगर,बी पी चौधरी आदी - Divya Marathi
बोहरा जि प शाळेत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी ए डी पाटील सोबत शिक्षणविस्तार अधिकारी पी डी धनगर,बी पी चौधरी आदी
अमळनेर - सध्या इंग्रजी शिक्षणाकडे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थी जाण्याचे प्रमाण वाढल्याने मराठी शाळांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काळानुसार बदलावे लागत आहे. तरच ते या स्पर्धेच्या युगात टिकू शकतील यामुळे तालुक्यातील अनेक जि.प. शाळा या गटशिक्षणाधिकारी ए डी पाटील यांच्या पुढाकाराने डिजिटल करण्यावर सध्या भर दिली जात आहे. त्यात तालुक्यातील बोहरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
 
या डिजिटल शाळेचे उदघाटन नुकताच पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ए डी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांचे सोबत शिक्षणविस्तार अधिकारी पी डी धनगर,बी पी चौधरी,मारवड केंद्र प्रमुख गुलाब पाटील,शहापूर केंद्र प्रमुख अशोक सोनवणे, गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ,मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.
 
अध्यक्षीय भाषणात ए डी पाटील म्हणाले कि शिक्षकाने कोणतीही गोष्ट मनापासून केली तर ती शक्य होऊ शकते. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्वतःला बदलावे लागेल.बोहरा जि प शाळेतील शिक्षकांनी गावातील दानशूर,गाव सहभाग व शिक्षण प्रेमींचे योगदान घेऊन शाळा डिजिटल केल्या मुळे मला विशेष आनंद झाला आहे.
 
शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यता,उपक्रम,विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षण दर्जेदार दिल्यास मराठी शाळांना भविष्यात चांगले दिवस येतील असे सांगितले. उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक राजू ठाकरे व शिक्षक भीक बोरसे,प्रकाश पाटील,गोपाळ महाजन यांनी केले.
 
शाळा डिजिटल करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी,शिक्षणविस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,यांचे मार्गदर्शन व शाळेतील शिक्षकांचे अथक प्रयत्न,दानशूर व्यक्ती,गावातील शिक्षण प्रेमी पालक वर्ग यामुळे बोहरा जि प शाळा डिजिटल होऊ शकली असे शाळेचे मुख्याध्यापक राजू ठाकरे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले. 
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी... 
बातम्या आणखी आहेत...