आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहायक वनसंरक्षकास दाेन लाखांची लाच घेताना पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यावल वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सूर्यकांत चावदस नाले याला लाख ८२ हजारांची लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात अाले. शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या ५० ते ५५ लाख रुपयांच्या निधीच्या चार टक्के प्रमाणे ही लाच घेतली हाेती. 
 
जळगाव ये‌थील सूर्यकांत चावदस नाले(वय ५७) हे यावल वनविभागाच्या जळगाव कार्यालयात सहायक वनसंरक्षक अाहेत. तर तक्रारदार वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. तक्रारदाराने डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत वनपरिक्षेत्रात विविध शासकीय कामे केलेली हाेती. ही कामे केल्याची माहिती सहायक वनसंरक्षक सूर्यकांत नाले याने त्याच्या सहीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवलेली होती. या कामांचा ५० ते ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर हाेऊन यावल वनविभागाला मिळाला. त्यानंतर नाले यास मंजूर शासकीय निधीच्या चार टक्के या प्रमाणे तक्रारदाराचा खर्च वगळून लाख ७३ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने गुरुवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार गुरुवारीच एसीबीच्या पथकाने जळगावातील यावल वनविभागाच्या कार्यालयात सापळा लावला होता. मात्र, नाले मुंबईला गेलेले असल्याने कारवाई होऊ शकली नाही. शुक्रवारी नाले तक्रारदार यांच्यात तडजोडीअंती लाख ८२ हजार रुपयांचा मोबदला देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर पुन्हा सापळा लावला असता, नाले याला तक्रारदाराकडून लाख ८२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील गांगुर्डे, पाेलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

दुसरी माेठी कारवाई 
जळगाव जिल्ह्यात लाच घेताना पकडलेली महिन्याभरातील ही दुसरी माेठी कारवाई अाहे. यापूर्वी १९ एप्रिल राेजी जळगावातील तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेश हनुमंत सावंत यांना लाख २५ हजारांची लाच घेताना पकडण्यात अाले हाेते. 

कपाटातून मालमत्तेची कागदपत्रे घेतली ताब्यात 
एसीबीच्यापथकाने लाच घेतल्याप्रकरणी नाले याला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री वाजेच्या सुमारास त्याच्या जळगावातील भूषण कॉलनीतील घराची झाडाझडती घेतली. कपाटातील मालमत्तेची कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत. रात्री उशिरापर्यंत घराची तपासणी सुरुच होती. 

 
बातम्या आणखी आहेत...