आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयद्रावक, कारचा भडका पाहून नागरिक सुन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धगधगत्या कारचे दृश्य पाहून जनसमुदायही सुन्न झाला. - Divya Marathi
धगधगत्या कारचे दृश्य पाहून जनसमुदायही सुन्न झाला.
जळगाव - महामार्गावर कंटेनर-कार अपघात होताच रस्त्यावरून जाणारे दुचाकी-चारचाकी वाहनधारक, प्रवासी, आहुजानगर परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. कारचा भडका पाहून जनसमुदायाच्या काळजाचा ठोकाच चुकला. प्रत्येक जण सुन्न झाला होता. अपघातामुळे रात्री महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली हाेती. रात्री ते ११ वाजेदरम्यान वाहनांची वर्दळ अधिक असल्याने प्रत्येक मिनिटाला ते १० वाहनांची रांगेत भर पडल्याने खाेटेनगरपासून अाकाशवाणी चाैकापर्यंत आणि गिरणा नदी पुलापलीकडे पाळधीपर्यंत रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली हाेती.
महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी पाेहचवण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने मार्ग माेकळा ठेवण्यात अाला हाेता. पेटलेल्या कंटेनरवर अागीचे लाेळ असल्याने दाेन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प हाेती. महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेकडून रात्री उशिरापर्यंत अाग विझवण्याचे प्रयत्न सुरू हाेतेे. कंटेनरचालकाने उडी मारून धूम ठाेकली तर कंटेनरमध्ये असलेल्या तिघा महिलांनी उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही महिला कारमधील एकास घेऊन रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात पाेहचली. तर कारमध्ये असलेल्या इतर तिघांना घेण्यासाठी दुसरी रुग्णवाहिका रात्री ९.४० वाजता घटनास्थळी पाेहचली. गर्दीतून रुग्णवाहिका अाग लागलेल्या कंटेनरपर्यंत पाेहचली. परंतु कंटेनरशेजारी असलेल्या कारमधील तिघे प्रवासी जळून खाक झाल्याने ही रुग्णवाहिका पुन्हा परत फिरली.
अग्निशमन विभागाचे शर्तीचे प्रयत्न
महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा अाग लागताच ३० मिनिटांमध्ये घटनास्थळी पाेहचली. अग्निशमन विभागाचे दाेन बंब घटनास्थळी पाेहचले. वाहतूक पाेलिसांनी मदत कार्यात अडथळा हाेऊ नये म्हणून रस्त्यावर बंदाेबस्त लावला. कंटेनरचा पुढचा भाग जळत असताना बंद असलेल्या मागील बाजूने धूर निघत हाेता.
जुने जळगावात हिरामण विसपुते यांचे शनिवारी दुपारी निधन झाले हाेते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भामरे कुटुंबीय नाशिकहून येत हाेते. ते रात्री ९.३० वाजेपर्यंत पाेहचणार असल्याने रात्री १० वाजता विसपुते यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार हाेते. परंतु घर अवघे किलाेमीटरवर असताना भामरे कुटुंबीयांचा शहराजवळच अपघात झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने अंत्यसंस्कारासाठी भामरे कुटुंबीयांची वाट पाहत थांबलेल्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
बातम्या आणखी आहेत...