आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहानलेल्या पक्ष्यांची दहा वर्षांपासून पंचभाई कुटुंबीय भागवताय तृष्णा, दिव्य मराठी’चेही अभियान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - दहा वर्षांपूर्वी भरउन्हात पाण्यासाठी व्याकूळ पक्ष्याला गतप्राण होताना पाहून हेलावलेल्या प्रशांत पंचभाई यांनी त्यांच्या निवासस्थानी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे. तेव्हापासून पंचभाई त्यांच्या कुटुंबीयांनी अविरतपणे भूतदयेचा उपक्रम जपला आहे. त्यामुळे पंचभाई कुटुंबीयांच्या घरामागील छोटेखानी बागेत भरउन्हात गेल्यावरही पक्ष्यांचा चिवचिवाट आणि पाण्यात खेळणारे पक्षी सहज दिसून येतात. 
 
देवपूर परिसरातील महाराणा प्रताप हायस्कूलजवळ राजपूत कॉलनी आहे. या भागातील मीरा व्हिला येथे प्रशांत मिलिंद पंचभाई राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. भूतदया हाही सामाजिक कार्याचाच भाग असल्याचे मानून गेल्या दहा वर्षांपासून प्रशांत पंचभाई हे घराच्या मागील बाजूस असलेल्या छोटेखानी बागेत पक्ष्यांसाठी चुकता पाणी ठेवतात. त्यामुळे या ठिकाणी उन्हाळ्यातही पक्ष्यांची गर्दी दिसून येते. पक्षीप्रेमापोटी पंचभाई कुटुंबीयांकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामागे अंगावर शहरे आणणारे अनुभव आहेत. अमरावती येथे जाताना पाण्याअभावी एका पक्ष्याला मरताना पाहिले. यानंतर अवघ्या काही दिवसांच्या फरकाने आपल्या घरी पाण्यासाठी व्याकूळ शिकारी पक्षी आला. पाण्यासाठी बादलीत चोच बुडवताना तो पाण्यात पडला. जखमी तहानेने हा पक्षी व्याकूळ होता. या घटनांमुळे पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याची कल्पना समोर आली. पंचभाई यांच्या बागेत विविध पक्षी दिसून येतात. पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी मातीचे वाडगे, आइसस्क्रीम, श्रीखंड, प्लास्टिकच्या रिकाम्या कपांचा वापर केला आहे. बगिच्यातील झाडांच्या फांद्या आणि संरक्षण भिंतीवर पाण्याचे भांडे ठेवण्यात आले आहे. कुटुंबातील जयवर्धन, केतकी साहील ही लहान मुले सकाळी पक्ष्यांसाठी पाणी ठेवतात. त्यातील पाणी संपणार नाही याची काळजी घेतात. 
 
पुण्यकर्मापेक्षा बांधिलकी महत्त्वाची 
- प्रत्येक धर्म,पंथामध्ये पुण्यकर्म सांगितले आहे. मूक पशू-पक्ष्यांसाठी दाणा पाण्याची सोय केल्यामुळे मिळणारे समाधान शब्दात मांडता येणार नाही. पुण्यकर्म म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. इतरांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे.
-प्रशांत पंचभाई , धुळे 
 
पुढील स्लाइडवर वाचा, दिव्य मराठी’चेही अभियान आणि समाजात वाढतेय सकारात्मकता... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...