आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅन्सरग्रस्तांवर प्रत्याराेपणाच्या २०० शस्त्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कर्कराेगामुळे जीभ, जबडा, गाल यासारखे शरीराचे भाग काढून प्रत्याराेपण करण्याच्या २०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया जळगावात झाल्या अाहेत. अवघ्या वर्षांच्या मुलापासून ८५ वर्षांच्या वृद्धापर्यंत काेणताही अवयव काढता कॅन्सर रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या अाहेत. मुंबई, दिल्लीसारख्या ठिकाणी अवघड वाटणाऱ्या या शस्त्रक्रिया जळगावात डाॅ.नीलेश चांडक यांनी पाच ते सात तासांमध्ये केल्या अाहेत. या शस्त्रक्रिया करताना रुग्णाला उर्वरित.पान १२
बाहेरूनअाॅक्सिजन किंवा रक्त देण्याची गरज पडली नाही.

जळगावातील चांडक कॅन्सर केअर या हाॅस्पिटलमध्ये डाॅ.नीलेश चांडक यांच्यासह प्लॅस्टिक सर्जन, भूलतज्ज्ञ अाणि सहायक डाॅक्टरांच्या टीमने गेल्या सहा वर्षांत अनेक अशक्य वाटणाऱ्या २०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या अाहेत. यातील अनेक जणांना मुंबईतील टाटा कॅन्सर हाॅस्पिटलमध्ये रुग्णांची वेटिंग लिस्ट माेठी असल्याने जळगावात पाठवण्यात अाले हाेते. महिन्याला तीन ते सहा शस्त्रक्रिया जळगावात हाेत अाहेत. या शस्त्रक्रियेमुळे कर्कराेगामुळे येणारी कुरूपता,विद्रूपता दूर हाेते.

केसक्र.- : जळगावातील४० वर्षीय व्यक्तीवर याच अाठवड्यात मुख कर्कराेगाची शस्त्रक्रिया करण्यात अाली. ताेंडातील मांस अाणि हाडापर्यंत कर्कराेग पसरल्याने जबड्याचा काही भाग अाणि मांस काढून टाकावे लागले. या शस्त्रक्रियेमुळे चेहरा कुरूप हाेणार असल्याने शस्त्रक्रियेवेळी पायात पाेटरीजवळ असलेल्या भागातून फिब्युला या हाडाचा भाग, स्नायू, मांसपेशीसह रक्तवाहिन्या अाणि त्वचा काढण्यात अाली. त्यापासून जबड्याच्या अाकाराचा भाग तयार करून ताे जबड्यात पुनर्राेपीत करण्यात अाला. रक्तपेशी, धमण्यांची जाेडणी करून त्यातून पातळ केलेले रक्त पास केले. पायातील हाड, मांस काढलेल्या भागावर मांडीवरील त्वचा लावण्यात अाली. ते तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान,रुग्णाला अाॅक्सिजन, रक्त देखील देण्याची गरज भासली नाही. अवघ्या १० दिवसांत रुग्णाची रुग्णालयातून सुट्टी करण्यात अाली.

केस क्र. : इंदूरयेथील साडेचार वर्षीय बालकाला कपाळावर कर्कराेग झाल्याने त्याच्या कान, डाेळा अाणि कपाळ दरम्यानचेे हाड, मांस काढून टाकावे लागले. त्या ठिकाणी माेठा खड्डा पडल्याने चेहरा कुरूप हाेण्याचा धाेका हाेता. यासाठी मांडीतील हाड, स्नायू अाणि त्वचेचा वापर करून कपाळाजवळील भाग पुनर्राेपन करण्यात अाले. तासांच्या शस्त्रक्रियेत १०० मिली लिटर रक्तस्त्राव झाला. शस्त्रक्रियेसाठी २.५ लाख रुपये खर्च अाला.

केस.क्र. : जळगावपासूनजवळच असलेेल्या माेहाडी येथील ७५ वर्षीय वयाेवृद्ध व्यक्तीला जिभेचा कर्कराेेग झाल्याने जीभ काढून टाकावी लागणार हाेती. गेल्या पंधरवड्यात या वृद्धावर शस्त्रक्रिया करून जीभ कापण्यात अाली. त्याच्या छातीतील स्नायू काढून त्यापासून दुसरी जीभ तयार करून तिचे प्रत्याराेपण करण्यात अाले. जीभ प्रत्याराेपणानंतर अवघ्या पंधरवड्यात रुग्ण हलका अाहार, तर तिसऱ्या अाठवड्यात जेवण घेऊ शकत अाहेत.

लक्ष दिल्यास शस्त्रक्रिया टाळता येते
^मुखाच्या कर्कराेगामुळे रुग्णाला कुरुपता येते. ही शस्त्रक्रिया शेवटच्या टप्प्यात गेल्यास करावी लागते. रुग्णांनी जागरूक राहून पहिल्या टप्प्यात उपचार घेतले तर ही अवघड अाणि महागडी शस्त्रक्रिया करण्याची गरज राहत नाही. जीभ, जबडा अाणि गालाच्या प्रत्याराेपणाची शस्त्रक्रिया करणे हे टीमवर्क असते. रुग्णाचा अात्मविश्वास वाढवत राहणे, त्यांना घरी असल्यासारखे वाटावे याची काळजी घ्यावी लागते. रुग्णाचा प्रतिसाद मिळाला तर लवकर अाणि चांगले रिझल्ट येतात. प्लॅस्टिक सर्जरीमुळे कर्कराेगाशी लढणाऱ्या रुग्णांचा अात्मविश्वास वाढताे. कर्कराेगाच्या उपचारासाेबत चेहरा विद्रूप हाेता पहिल्यासारखा हाेत अाहे. -डाॅ.नीलेश चांडक, कर्कराेगतज्ज्ञ. जळगाव

बातम्या आणखी आहेत...