आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल पडल्याचे सांगून भाड्याची कार पळवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुंबई येथून भाड्याने आणलेली कार मोबाइल खाली पडल्याचा बहाणा करून दोन चोरट्यांनी पळवल्याची घटना शुक्रवारी रात्री १२ वाजता अजिंठा रस्त्यावरील जळके शिवारात घडली. ट्रॅव्हल कंपनीकडून गाडी भाड्यावर घ्यायची, लघुशंका अथवा इतर बहाण्याने गाडी थांबवून नंतर चालक खाली उतरताच कार पळवण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना असून, यामागे कारचाेरांची टोळी असल्याचा संशय आहे. डिसेंबर महिन्यातही याच पद्धतीने कार पळवल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित अद्यापही कारागृहात आहेत.
 
मुंबई येथील शंभू विश्वनाथ घाेष यांच्या मालकीची कार (क्र.एमएच-०३/सीअार-१८८७) दाेन जणांनी जामनेर येथे जाण्यासाठी मार्च राेजी फाेन करून भाड्याने घेतली. कल्याण-भिवंडी नाक्यावरून दोघे गाडीत बसले. त्यांनी भुसावळ येथे पत्नीला घेण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी अगाेदर जामनेर येथे जायचे असल्याचे सांगून शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास कार जळगावकडून जामनेरच्या दिशेने वळवली. जळके शिवारात गाडी आल्यानंतर लघुशंकेचा बहाणा करून चालक विक्रम धीरेंद्र दासला कार थांबवण्यास सांगितले. मात्र, चालक विक्रम खाली उतरल्याने त्यांची याेजना फसली.
 
 काही अंतरावर एका भामट्याने पाण्याची बाटली खाली फेकली. त्या वेळी माेबाइलही खाली पडल्याने सांगून चालक विक्रमला खाली उतरून माेबाइल अाणण्यास सांगितले. ताे उतरल्यानंतर कार घेऊन चाेरटे औरंगाबादच्या दिशेने गेले. याप्रकरणी विक्रम धीरेंद्र दास याने दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी एमअायडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी करीत आहेत. याप्रकरणी निरीक्षक सुनील कुराडे यांनी औरंगाबाद पोलिसांशी संपर्क साधला असून, टोळी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 
 
ही आहे चोरीची पद्धत 
मुंबई येथील खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडील महागड्या कार भाड्याने घेऊन जळगाव-जामनेर मार्गावर मध्यरात्री आणायच्या निर्जन ठिकाणी अंधार असलेल्या रस्त्यावर जोरात लघुशंका लागल्याचा बहाणा करून गाडी थांबव, असे चालकाला सांगून वाहन थांबवायला भाग पाडायचे. कार थांबल्यावर चालक खाली उतरला की, कार पळवून नेत जामनेरमार्गे औरंगाबादच्या दिशेने पळ काढायचा अशा प्रकारे कारचोरी करणाऱ्या टोळीने जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर उच्छाद मांडला आहे. 
 
अजिंठा लेणीमुळे चोरांचे फावते 
औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे. ही लेणी पाहण्यासाठी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार भाड्याने घेऊन लोक येत असतात. यात मुंबई येथून येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यात जळगाव-जामनेर सांगितले की, लगेच ट्रॅव्हल्स मालक किलोमीटरवर वाहन उपलब्ध करून देतात. त्यामुळे चोरट्यांच्या टोळीचे चांगलेच फावते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...