आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीअायचे पथक परतले, अाता मुंबईत पुढील चाैकशी, जळगाव जिल्हा बँक नाेट बदली प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चाेपडा शाखेत ७३ लाख रुपयांच्या नाेटा बदलून दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चाैकशीसाठी अालेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीअाय) अधिकारी गुरुवारी रात्रीच मुंबईत परतले. या गुन्ह्यात अाराेपी असलेल्या जिल्हा बँकेतील तिन्ही अधिकाऱ्यांना संपर्कात राहण्याच्या सूचना सीबीअायकडून देण्यात अाल्या अाहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांना अधिक चाैकशीसाठी गरज भासल्यास मुंबईत जावे लागणार अाहे. दरम्यान, शुक्रवारी बँकेचे कामकाज सुरळीत सुरू झाले असले तरी अध्यक्षांसह एकही संचालक बँकेकडे फिरकला नाही. 
 
जिल्हा बँकेच्या चाेपडा शाखेत ते ११ नाेव्हंेबर दरम्यान, ७३ लाख रुपये बदलून दिल्याच्या प्रकरणात सीबीअायने बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, चाेपडा शाखेचे व्यवस्थापक डी. बी. पाटील, कॅशिअर रविशंकर गुजराथी यांच्यावर गुन्हा दाखल केला अाहे. सीबीअायने गुरुवारी चाेपडा अाणि जळगावातील बँकेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांची कसून चाैकशी केली.
 
तसेच कागदपत्रे ताब्यात घेतल्यावर सीबीअायचे पथक मुंबईकडे रवाना झाले. शुक्रवारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख हे दुपारी १२.३० वाजता जिल्हा बँकेत अाले. गुरुवारी झालेल्या कारवाईसंदर्भात त्यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘सीबीअायच्या अधिकाऱ्यांना चाैकशीत अापण सर्व सहकार्य केले अाहे यापुढेही करत राहू.’ 
 
पैसे कुणाचे चाैकशीनंतर कळेल 
एमडीजितेंद्र देशमुख यांनी सांगितले की, जिल्हा बँकेच्या चाेपडा शाखेतून पैसे बदलून दिल्याच्या प्रकरणाची माहिती नव्हती. सीबीअायच्या तपासणीनंतर ही बाब लक्षात अाली हाेती. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून चाेपड्यातून बदलून देण्यात अालेले पैसे कुणाचे, हे चाैकशीनंतरच कळू शकेल. गेल्या अाठवड्यात सीबीअायचे पथक चाेपड्यात येऊन गेले हाेते. त्या वेळी जिल्हा बँकेत नाबार्डमार्फत तपासणी सुरू हाेती. 
 
ही तपासणी अाटाेपल्यानंतर चाेपड्यातील प्रकरणाची माहिती घेण्यासाठी तेथील दप्तर जळगाव येथील मुख्यालयात अाणले हाेते. या दप्तराच्या अनुषंगाने चाैकशी करण्यासाठी सीबीअायचे पथक जिल्हा बँकेत अाले अाले. सीबीअायचे अधिकारी सकाळी ७.३० वाजता घरी पाेहचले हाेते. सकाळी १० वाजेपर्यंत अधिकाऱ्यांनी घराची तपासणी करून लेखी अहवाल तयार केला. 
 
पैसे कुणाचे तेही सांगावे? 
चाेपडा शाखेतील शाखा व्यवस्थापक अाणि कॅशिअर माझ्या अादेशावरून पैसे दिल्याचे म्हणत असतील, तर ते पैसे कुणाचे हाेते हे देखील त्यांनीच सांगितले पाहिजे. या प्रकरणाबाबत मी अनभिज्ञ हाेताे. सीबीअायची चाैकशी सुरू झाल्यानंतर हे प्रकरण पुढे अाले अाहे. सीबीअायच्या चाैकशीत पैसे बदलले किंवा नाही, बदलले असतील तर पैसे कुणाचे हाेते, हे देखील स्पष्ट हाेणार असल्याचे देशमुख म्हणाले. 
 
दाेन कागदपत्रे ताब्यात 
सीबीअायचे अधिकारी विलास मुरगड यांनी चाेपडा शाखेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. चाेपडा शाखेचे रफ कॅश बुक अाणि कॅश समरी या कागदपत्रांची तपासणी करण्यात अाली. दाेन्ही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी पुढील चाैकशीसाठी ताब्यात घेतले अाहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...