आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अधिवेशन, 2 हजार कर्मचारी नाेंदवणार सहभाग रविवारी हाेणार उद‌्घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - सीअारएमएसचे ४८ वे वार्षिक अधिवेशन तब्बल वर्षांनंतर भुसावळात हाेणार अाहे. अधिवेशनात मध्य रेल्वेतील नागपूर, भुसावळ, मुंबई, पुणे साेलापूर या पाच विभागांमधील सुमारे दोन हजार रेल्वे कर्मचारी सहभागी होणार आहेत. ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत कृष्णचंद्र सभागृहात अधिवेशन होणार आहे.
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या अायोजनाचा मान यंदा भुसावळला मिळाला आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या तयारीला गती देण्यात आली आहे. अधिवेशनाला येणाऱ्या सदस्यांच्या निवासाची व्यवस्था स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली अाहे. तब्बल नऊ वर्षांनंतर भुसावळात अधिवेशन हाेत असल्याने संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये माेठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अाहे.

एनएफअायअारचे महामंत्री डाॅ. एम. रघुवय्या, डाॅ. अार.पी. भटनागर पूर्णवेळ या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणार अाहे, तर १२ डिसेंबरला मध्य रेल्वेचे नवनियुक्त महाव्यवस्थापक डी.के. शर्मा खुल्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह जाणवत असल्याचे दिसले.

विशेष डब्यांची केली व्यवस्था
पाचही विभागांतून येणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक विभागातून दाेन रेल्वे डबे अारक्षित केले जाणार आहेत. अधिवेशनात जुन्या मित्रांची भेट होत असल्याने एक प्रकारे कर्मचाऱ्यांचे गेट टुगेदर रंगते. प्रत्येक विभागातील कर्मचारी या अधिवेशनात भेटून सुख, दु:खाच्या गाेष्टी सांगतात. ऋणानुबंधाचे नाते यातून प्रस्थापित हाेऊन ते टिकून राहण्यास मदत हाेत असते.
अधिवेशनात या विषयांवर चर्चा
चार्टर अाॅफ डिमांड (६५ मागण्या), न्यू पेन्शन स्कीम रद्द करणे, प्रमाेशन तथा ग्रेड पेमध्ये सुधारणा, बाेनसची मर्यादा वाढवणे, एफडीअाय रद्द करणे, लार्जेस स्क्रीम अन्य विभागांत तातडीने लागू करणे, रिक्त जागा भरणे, रिक्त जागा भरताना अनुकंपा तत्वाला प्राधान्य देणे या विषयांवर वार्षिक अधिवेशनात चर्चा केली जाणार अाहे. जास्तीत जास्त विषय मार्गी लागतील, अशी माहिती अायाेजकांनी दिली. अधिवेशनस्थळाची स्वच्छता करण्याचे काम वेगात सुरू अाहे.

मंडळाध्यक्ष घेताहेत कामांचा अाढावा
‘सीअारएमएस’तर्फेवार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी रंगरंगोटी करण्याचे काम सुरू अाहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी झेंडे-पताका, डिजिटल बॅनर्स लावणे, मंडप टाकणे अशी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत, तर बाहेरून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी फराळ आणि जेवणाच्या व्यवस्थेबाबत नियोजन केले जात आहे. विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून, कामांची वाटणी करून देण्यात आली आहे. सीअारएमएसचे मंडळाध्यक्ष व्ही.के. समाधिया, मंडळ सचिव एस.बी. पाटील, पी.एन. नारखेडे तयारीचा आढावा घेत आहेत. सर्व नियोजन चोखपणे पार पाडले जात आहे. अधिवेशन लक्षवेधी ठरावे, यासाठी स्थानिक पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत अाहेत. अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक सदस्याची निवास, भाेजनाची व्यवस्था करण्यात अाली अाहे.

बाहेरून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या सुविधेसाठी नियोजनावर भर
-भुसावळ विभागातयापूर्वी २००७ मध्ये वार्षिक अधिवेशन झाले हाेते. त्यानंतर यंदा अधिवेशन हाेत अाहे. त्यामुळे संपूर्ण विभागातील पदाधिकारी कामाला लागले आहेत. बाहेरून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नियोजन केले जात आहे. तयारी अंतिम टप्प्यात अाहे. विविध समित्यांचीही नियुक्ती केली अाहे.
-एस.बी. पाटील,मंडळ सचिव, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ
बातम्या आणखी आहेत...