आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छडी मिरवणुकीसाठी पाेलिस सतर्क, ३१ उपद्रवींना शहरबंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात गाेगा नवमीनिमित्त काढण्यात येणारी छडी मिरवणूक निर्विघ्न पार पडावी म्हणून पाेलिस यंत्रणा सतर्क झाली अाहे. मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून पाेलिसांनी दाखल केलेल्या शहरबंदीच्या ३१ प्रस्तावांवर प्रभारी प्रांताधिकारी मीनाक्षी राठाेड-चव्हाण यांनी गुरुवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे प्रस्तावात नाव समाविष्ट असलेल्या विघ्नसंताेषींना अाता २५ ते २७ अाॅगस्ट असे तीन दिवस भुसावळ शहराबाहेरच मुक्काम ठाेकावा लागणार अाहे.
भुसावळ- अागामी सण, उत्सव लक्षात घेता पाेलिस प्रशासनाने शहरातील उपद्रवींना शहरबंदी करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलीत करून प्रस्ताव तयार केले. त्यात गाेगा नवमीच्या पार्श्वभूमीवर विघ्नसंताेषींना शहरबंदी करावी, असे सूचित करण्यात अाले हाेते.त्यानुसार पाेलिस प्रशासनाने प्रांताधिकारी कार्यालयाकडे ३१ जणांचे प्रस्ताव सादर केले.

प्रभारी प्रांताधिकारी मीनाक्षी राठाेड-चव्हाण यांनी गुरुवारी या प्रस्तावांवर स्वाक्षऱ्या केल्या. दुपारपासून पाेलिसांनी शहरबंदीचे अादेश बजावण्याचे काम सुरू केले. बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सराेदे यांनी संबंधितांना नाेटिसा बजावण्याचे अादेश डीबी पथकातील कर्मचाऱ्यांना दिले अाहेत. शहरबंदी असलेल्या विघ्नसंताेषींना गुरुवार ते शनिवार असे तीन दिवस शहराबाहेर राहावे लागेल. नाेटीस बजावण्यासाठी गेलेल्या पाेलिसांना जर एखादी व्यक्ती घरी सापडली नाही तर घराच्या भिंतीवर नाेटीस डकवण्याच्या सूचना डीबी पथकाला अावर्जून करण्यात अाल्या अाहेत.

प्रभारी प्रांतांनीशहरबंदीच्या प्रस्तावांवर स्वाक्षऱ्या केल्या अाहेत. २५ ते २७ असे तीन दिवस ३१ जणांना शहरबंदी करण्यात अाली अाहे. गणेशाेत्सव काळातही असे अादेश काढले जातील. ते प्रस्तावसुद्धा प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात अाले अाहेत. शहरबंदीचे उल्लंघन झाले तर गुन्हे दाखल हाेतील. राेहिदासपवार, उपविभागीय पाेलिस अधिकारी, भुसावळ
शहरबंदीत यांचा समावेश
श्यामजगन चावरिया, सुनील शालिग्राम चावरिया, सादिक जाकीर बागवान, सलीम अमजद सय्यद ऊर्फ पप्पू, नितीन अाेंकार डाेळे, साेनू पल्लू चावरिया, निशांत प्रकाश नुरकीले, दीपक दयाराम चावरिया, पापा उर्फ शिवराम नारायण चावरिया, मनाेज दयाराम चावरिया, लक्ष्मण जगन चावरिया, जितू ऊर्फ गाेट्या एकनाथ घावरे, विनाेद चावरिया, शालिग्राम जगन चावरिया, नंदू ऊर्फ कालू राजेद्र बाेथल, शेख रशीद शेख मासूम, विनाेद डाेंगरदिवे, अजय परशुराम पथराेड, विष्णू पथराेड, शैलेद्र मनाेज बारसे, कृणाल राजू धनवाल, सागर साहेबराव अहिरे, शेख फकिरा शेख युसूफ, विशाल पूनम पथराेड, नटवरलाल ऊर्फ नट्टू चंडाले, विजय रूपसिंग खरारे, मिथून पवार (जाट), शम्मी प्रल्हाद चावरिया, धिरज गिरीराज खरारे, मंगल ताराचंद तुंडायत, तुषार खरारे अशा ३१ जणांना तीन दिवसांपर्यंत शहरबंदी करण्यात अाली अाहे.

गणेशाेत्सवात हद्दपारीचे अादेश निघणार
शहर बाजारपेठ हद्दीतील १५ विघ्नसंताेषींचे हद्दपारीचे प्रस्ताव पाेलिस प्रशासनाने तयार केले अाहेत. प्रांताधिकारी कार्यालयात यापैकी एकूण १२ प्रस्ताव दाखल झाले असून येथून हे प्रस्ताव डीवायएसपी कार्यालयाकडे चाैकशीसाठी देण्यात अाले अाहेत. डीवायएसपी राेहिदास पवार हे संबंधितांची चाैकशी करतील. त्यानंतर चाैकशी अहवाल प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर झाल्यानंतर हद्दपारीचे अादेश निघण्याची दाट शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...