आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नपत्रिका देण्यास गेलेल्या वधुपिता-पुत्राचा अपघाती मृत्यू; ताबा सुटल्याने डंपरही पलटी, एक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चक्काचूर झाली. डंपरही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. - Divya Marathi
डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चक्काचूर झाली. डंपरही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले.
चाळीसगाव- (मेहुणबारे) धुळे येथून मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथे भावाकडे मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी निघालेल्या वधुपित्याचा मुलासह अपघातात मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.५५ वाजता खडकीसिम फाट्यानजीक घडली. डंपरने दुचाकीला जाेरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. दरम्यान, या अपघातातील जखमीस धुळे येथे साेडून परतणाऱ्या रुग्णवाहिकेचाही दहिवद फाट्याजवळ अपघात झाला. 
जुने धुळ्यातील नवनाथनगर परिसरातील रहिवासी नामदेव वामन वाडिले (भाेई, वय ५५), त्यांचा मुलगा राकेश वाडिले (वय २०) नामदेव वाडिले यांच्या शालकाचा मुलगा यश संजय भाेई (वय १६) हे तिघेही दुचाकी (एमएच १८, एएम १४९०) ने धुळ्याहून मेहुणबारेकडे निघाले.
 
मेहुणबारे नजीक असलेल्या खडकीसिम फाट्याजवळ समाेरून येणाऱ्या डंपर(क्रमांक एम.एच.४५ १९४७) ने दुचाकीला जाेरदार धडक दिली. अपघात घडल्यानंतर डंपरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने डंपर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात नामदेव वाडिले त्यांचा मुलगा राकेश वाडिले हे जागीच ठार झाले. तर साेबत असलेला यश भाेई हा गंभीर जखमी झाला. 

१९ मे राेजी हाेते मुलीचे लग्न 
अपघातात ठार झालेले नामदेव वाडिले यांची दाेन नंबरची मुलगी ममता हिचा विवाह दि.१९ मे राेजी हाेता. यासाठी लग्नाची तयारी सुरू हाेती. मेहुणबारे येथे त्यांचे सख्खे भाऊ सुकदेव वाडिले राहतात. त्यांना पत्रिका देऊन ते बहाळ येथील नातेवाइकाकडे पत्रिका देण्यासाठी जाणार हाेते. परंतु वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. 
 
मृतदेहपडून; जखमीची विनवणी 
अपघातात मृत झालेल्या पिता-पुत्राचा मृतदेह २० ते २५ मिनिटे रस्त्यावरच पडून हाेते. तर गंभीर जखमी झालेला यश हा स्वत:ला वाचवण्यासाठी हुंदके देऊन विनवणी करीत हाेेता. परंतु रस्त्यावरून जाणाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. २५ मिनिटांनी दाेन दुचाकीस्वार मदतीसाठी थांबले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने यशला उपचारासाठी रवाना केले. 
 
 
रुग्णवाहिकेला अपघात; ट्रक, बाेेलेराे पलटी 
खडकी सिमफाट्यानजीक झालेल्या या अपघातात जखमी झालेला यश भाेई हा मूळचा सावदा (ता.रावेर, जि.जळगाव) येथील रहिवासी असून ताे शाळेला सुटी लागल्याने खास विवाहाच्या तयारीसाठी धुळे येथे वाडिले कुटुंबीयांकडे अाला हाेता. ताे अपघातात जखमी झाल्याने त्याला मेहुणबारे येथील एम.एच.१४ सीएल ०७६४ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला अपघात; १०८ या रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी नेण्यात अाले. तेथून ही रुग्णवाहिका मेहुणबारेकडे येत हाेती. तरवाडे गावाजवळ गतिराेधकावर रुग्णवाहिका हळुवार झाली असतानाच पाठीमागून अालेल्या ट्रकने (क्रमांक एम.एच.१८ ए.ए.७२०७) रुग्णवाहिकेस जाेरदार धडक दिली. नंतर ट्रकचालक तेथून पसार हाेत असतानाच रुग्णवाहिकेने ट्रकचा पाठलाग सुरू केला. भरधाव नि‌घालेल्या या ट्रकने पुढे दहिवद फाट्याजवळ एम.एच.३८-५३६ क्रमांकाच्या बाेलेराे चारचाकी वाहनास पाठीमागून धडक दिल्याने बाेलेराे पलटी झाली. त्यातील चालक अनिल धनराज पाटील हे जखमी झाले. या अपघातामुळे ट्रक पुन्हा सुसाट धावण्याच्या प्रयत्नात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दाेन वाहनांना धडक मारणारा हा ट्रकही पलटी झाला. मात्र, दारूच्या नशेत असलेला चालक क्लिनर या अपघातात बालंबाल बचावले. 
बातम्या आणखी आहेत...