आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालिया महोत्सवाची मिरवणुकीने सांगता, शाेभायात्रेत शहरातील सिंधी समाजबांधव सहभागी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरात सिंधी समाजाच्या चालिया महोत्सवाची (४० दिवसांचा उपवास) सांगता बुधवारी करण्यात अाली. सिंधी कॉलनी परिसरातून निघालेल्या शोभायात्रेत कलशधारी महिलांचे पथक आकर्षण ठरले. तापीनदीवर सायंकाळी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

सिंधी समाजाचे इष्टदेवता भगवान झुलेलाल यांचा ४० दिवसांचा उपवास ठेवला जातो. बुधवारी या उपवास सोहळ्याची सांगता करण्यात आली. यानिमित्ताने सिंधी कॉलनी परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सिंधी समाजातील हा महत्त्वाचा उत्सव मानला जातो.
बाजारपेठेतील सिंधी समाजबांधवांची दुकाने प्रतिष्ठाणे बुधवारी बंद होती. सिंधी कॉलनीतील प्रमुख मार्गाने मिरवणूक निघाली. तापीनदीजवळ विसर्जन करण्यात आले. चालिया महोत्सव समितीचे अध्यक्ष नारायणदास छाबडीया, राजा बजाज, गोपीचंद बजाज, नगरसेवक प्रकाश बतरा, रिंकू चेलानी, चेंट्रीचंड समितीचे अध्यक्ष अजय माखीजा, अजय मेघाणी, गोपाळ कमनानी, नानक बुधराणी, कालू माखीजा, मनीष शंबानी, शिवा बढेजा, आकाश कमनानी, सोनू माखीजा, अमर आगीचा, प्रकाश चांदवाणी आदी उपस्थित हाेते. यशस्वितेसाठी अायाेजन समिती समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
बातम्या आणखी आहेत...