आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त औषधींचा ठणठणाट कायम, नागरिकांना बसतोय आिर्थक भुर्दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेच्या १२ दवाखान्यांमध्ये औषधे मोफत दिली जातात. मात्र, सध्या औषधांचा ठणठणाट आहे. त्यामुळे नागरिकांना महागडे औषधे बाहेरून खरेदी करावी लागतात. परिणामी त्यांना आिर्थक भुर्दंड बसतो. त्यासाठी तातडीने ८४ प्रकारची अॅलोपॅथी आैषधी खरेदी करावी,अशी एकमुखी मागणी स्थायी समितीत नगरसेवकांनी केली. त्यानंतर या मागणीला मंजुरीही देण्यात आली.

मनपाच्या गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत अॅलाेपॅथी औषधांची खरेदी शासकीय दरापेक्षा कमी दराने करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांनी दिली. नगरसेवक संजय गुजराथी म्हणाले की, शासकीय दरापेक्षा कमी दराने औषधे खरेदी करताना औषधे चांगल्या कंपनी आहेत का नाही याची खात्री करा.
बॉम्बे मार्केटमधून औषधे खरेदी करू नये. शासकीय दरापेक्षा कमी दराने औषधे उपलब्ध होत असली तरी त्यांची गुणवत्ता तपासून घ्यावी, असेही ते म्हणाले. नगरसेवक साबीर अली म्हणाले की, औषधे खरेदी करण्यासाठी आतापर्यंत चार वेळा निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर दोन निविदा प्राप्त झाल्या. महापालिका प्रशासनाने औषध कंपनीच्या प्रतिनिधीकडून माहिती घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. या वेळी सभापती सोनल शिंदे यांनी औषधांसह कंपनीच्या नावाची यादी देण्याच्या सूचना केली. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी कमाल वेतनश्रेणीचा टप्पा गाठला आहे. कर्मचारी हजार ४४० ते हजार ४४० ग्रेड पे हजार ३०० ही वेतनश्रेणी घेत आहेत. आता या कर्मचाऱ्यांचे वेतन कमाल टप्प्यापुढे जात आहे. त्यामुळे ते वाढवण्यासाठी मंजुरी घ्यावी लागेल. त्यामुळे महिन्याला एक ते दीड लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यासाठी महापालिकेला आिर्थक नियोजन करावे लागणार आहे.
जयललितांना श्रद्धांजली
महापालिकेच्या स्थायी सभेत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाची दखल घेण्यात आली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी हा विषय सभागृहात मांडला. तो मंजूर झाला.
... तर सफाई कामगारांची शास्ती माफ
महापालिकेतील कायम सफाई कामगार काशिनाथ लोहरे, गोपाल लोहरे यांना पाच हजार रुपयांची शास्ती करण्यात आली होती. त्यावर चर्चा करण्यात येऊन या सफाई कामगारांची शास्ती माफ करण्यात आली आहे.
स्थायी समितीच्या सभेत औषध खरेदीच्या मुद्द्यावरून बोलताना नगरसेविका प्रतिभा चौधरी.
लिपिक कारवाईचा विषय महासभेपुढे महापालिकेतीलस्वच्छता निरीक्षक किशोर शिंदे यांना तत्कालीन उपायुक्त प्रदीप पठारे यांनी निलंबित केले होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची साध्या कागदावर हजेरी घेतल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई झाली होती. या संदर्भातील टिप्पणीनंतर आयुक्तांनी चौकशीसाठी चंद्रकांत उगले बी.बी. गिते यांना नियुक्त केले होते. त्यांनी शिंदे अंशत: दोषी आढळल्याचा अहवाल दिला. त्यावर आयुक्तांनी काय निर्णय घेतला हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हा विषय महासभेत पाठवण्यात यावा, अशा सूचना सदस्यांनी केल्याने हा विषय महासभेत पाठवण्याचे आदेश सभापती सोनल शिंदेंनी दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...