आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालय फसवणूकप्रकरणी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर अनामत रकमेची बनावट पावती तयार करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी नगरसेवक चेतन शिरसाळे यांच्यासह तिघांवर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील गजानन गोपाळ सोनार यास अटक करण्यात आली आहे. त्याला बुधवारी न्यायाधीश ए.डी.बोस यांच्या न्यायालयात उभे केले असता, २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
कासमवाडीतील गजानन सोनार याच्यावर सन २०११मध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. या खटल्या(२२८/२०१३)चा निकाल जिल्हा न्यायालयात नुकताच लागला. त्यात सोनार याची निर्दोष मुक्तता झाली. या खटल्यात त्याने अनामत रक्कम भरलेली नसतानाही ती परत मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला. त्याने त्याचे साक्षीदार प्रवीण गायकवाड योगेश यांच्यासह तिघांनी न्यायालयाच्या पावतीशी मिळतीजुळती जुन्या क्रमांकाची १५ हजारांची पावती तयार करून न्यायालयात सादर केली. फसवणूक केल्याने न्यायालयाने सोनारला नोटीस बजावली. उत्तरात त्याने मोबाइल, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, न्यायालयाची पावती हरवल्याचे म्हटले.

गायकवाड नव्हे, नगरसेवक शिरसाळे
सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी साेनारच्या सर्व मित्रांचे फोटो न्यायालयाच्या सहायक अधीक्षक जयश्री जोशी यांना दाखवले असता एक फोटो प्रवीण गायकवाडचा असल्याचे त्यांनी सांगितले. तोच न्यायालयात पावती घेऊन आल्याची माहितीही दिली. मात्र, तो फोटो प्रवीण गायकवाडचा नसून, नगरसेवक चेतन शिरसाळे यांचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.