आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुक्तांनी चेकपाेस्टवरील वसुलीचा अहवाल मागितला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुक्ताई नगर अाणि रावेर चेकपाेस्टवर ट्रकचालकांकडून हाेत असलेल्या बेकायदेशीर लुटीसंदर्भात परिवहन अायुक्त डाॅ.प्रवीण गेडाम यांनी चाैकशीचे अादेश दिले अाहेत. चेकपाेस्टवरील गैरकारभारासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने ९, १० फेब्रुवारी राेजी स्टिंग अाॅपरेशन करून वृत्त प्रसिद्ध केले हाेते. दाेन्ही चेकपाेस्टवरील सर्वप्रक्रिया महिन्यांत अाॅनलाइन करणार असून सर्व कामे पारदर्शक करणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. 
 
चेकपाेस्टवर स्थानिक पातळीवर हाेणाऱ्या गैरप्रकारची चाैकशी करून परिवहन अायुक्त प्रवीण गेडाम यांनी उपप्रादेशिक अधिकारी जयंत पाटील यांच्याकडून अहवाल मागितला अाहे. चेकपाेस्टवरील प्रक्रिया अाॅनलाइन करून गैरप्रकार राेखण्याचे काम सुरू झाले अाहे. येत्या सहा महिन्यांत चेकपाेस्टवरील कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया अाॅनलाइन हाेईल. सध्या इलेक्ट्राॅनिक वजन काटे अाणि सीसीटीव्ही कॅमेरे अाॅनलाइनप्रक्रियेला जाेडले अाहेत. लवकरच कागदपत्रे तपासणीची प्रक्रिया अाणि दंड स्वीकारण्याची प्रक्रियादेखील अाॅनलाइन करण्यात येणार अाहे. राेखीने दंड घेण्याएेवजी काॅर्ड पेमेंट घेतले जाणार अाहे. यासाठी स्टेट बंॅकेत चालू खाते उघडण्यात अाले अाहे. कोणत्याही प्रकारचा दंड कार्ड स्वाइप करून घेतला जाईल. त्यामुळे रोखीचे व्यवहार बंद होतील. परिणामी भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. वाहनांची कागदपत्रे तपासण्याची प्रक्रियादेखील बारकोडने केली जाणार आहे. एकदा का वाहन चेकपोस्टवर आले की, काही सेकंदात बारकोड स्कॅन होऊन वाहनाची संपूर्ण माहिती समोर येईल. त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे, अशी माहिती परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...