आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ : कामे करा, अन्यथा घरी बसा; आरोग्य कर्मचाऱ्यांना इशारा, सरप्राइज व्हिजीट देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना देताना नगराध्यक्ष रमण भोळे, सोबत उपनगराध्य युवराज लोणारी अन्य. - Divya Marathi
आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना देताना नगराध्यक्ष रमण भोळे, सोबत उपनगराध्य युवराज लोणारी अन्य.
भुसावळ - शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी गुरुवारी पालिकेच्या आरोग्य कर्मचारी, निरीक्षक मुकादमांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत स्वच्छतेसंदर्भातील आढावा घेवून कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्यास हयगय करता थेट कारवाईचा इशारा नगराध्यक्षांनी दिल्यामुळे कामचुकार कामगारांमध्ये खळबळ उडाली. 

देशभरात अमृत योजनेत सहभागी झालेल्या शहरांच्या सर्वेक्षणात भुसावळ शहर दुसऱ्या क्रमांकाचे अस्वच्छ शहर म्हणून जाहीर झाले. यामुळे शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने समोर आला. यानंतर पालिकेने घंटागाडी कंटेनर खरेदी, कचरा संकलनासाठी कंटेनर खरेदी आदींबाबत ठराव करुन पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र,स्वच्छता कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी गुरुवारी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर, गटनेते मुन्ना तेली आदींनी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
 
या बैठकीत नगराध्यक्षांनी संपूर्ण शहरात कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुकादम आणि निरीक्षकांनी तंबी देण्यात आली. सफाई कर्मचारी सातत्याने गैरहजर राहत असल्यास त्यांचा अहवाल प्रशासनाकडे द्यावा. यासह जे कर्मचारी कामचुकारपणा करत असतील, त्यांची माहिती कळवावी. याबाबत तातडीने कारवाई करू. दैनंदिन स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन करणार नाही, असा इशारा नगराध्यक्षांनी यांनी दिला. यावेळी नगरसेवक महेंद्र ठाकूर, पाणीपुरवठा सभापती किरण कोलते, अॅड. बोधराज चौधरी, माजी नगरसेवक वसंत पाटील, परिक्षित बऱ्हाटे, किशोर पाटील आदी उपस्थित होते. 
 
कार्यक्षमता वाढावी : शहराचा वाढलेला विस्तार पाहता दैनंदिन स्वच्छतेसाठी किमान एक हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या केवळ ३०२ कर्मचारी कार्यरत आहेत. कमी मनुष्यबळ असले तरी सद्यस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी, नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण व्हावे, रस्त्यांच्या दुतर्फा असलेला कचरा नियमितपणे संकलित करावा, यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. या बैठकीतील सुचनेनंतरही जे कर्मचारी कामचुकारपणा करतील, त्यांच्यावर मात्र कारवाईची कुऱ्हाड कोसळणे निश्चित आहे. 

बैठकीत अडचणी जाणून घेतल्या 
आढावा बैठकीत नगराध्यक्षांनी सफाई कामगार, आरोग्य निरीक्षक मुकादम यांच्याकडून कामांची अपेक्षा करीत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा देणे, आगामी काळात मनुष्यबळ वाढवणे, कचरा संकलन स्वच्छतेसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या मशिनरीचा वापर करणे आदींबाबतही सखोल चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांवरही निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

सरप्राइज व्हिजीट देणार 
पालिकेने शहरात स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना प्रथमत: कामाची शिस्त लावली जाणार आहे. कर्मचाऱ्यांकडून नेमून दिलेले काम वेळेत पूर्ण केले जाते काय? याची चाचपणी करण्यासाठी नगराध्यक्षांसह प्रभागांतील नगरसेवक सरप्राईज स्पॉट व्हीजिट करणार आहेत. याबाबत बैठकीत सूचना दिल्याने नेमलेली कामे मार्गी लागतील. 

अडथळा आणल्यास नोटीस 
शहरातीलसर्वच प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण थाटले जात आहे. फळविक्रेते, मांसविक्रीची दुकाने थाटून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. आरोग्य विभागाचे निरीक्षक मुकादमांनी याबाबत अडथळा निर्माण करणाऱ्यांची नावे कळवून त्यांना नोटीस बजावणे पोलिस कारवाई करण्यात यावी, अशा सूचना यावेळी नगराध्यक्षांनी दिल्या. 
बातम्या आणखी आहेत...