आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकाचा झाेळीत श्वास गुदमरून मृत्यू, पाराेळा येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
पाराेळा- झाेळीत श्वास गुदमरून दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना पाराेळा येथील कासार गल्ली भागात गुरुवारी दुपारी वाजता घडली. 
 
कासार गल्लीतील रहिवासी तथा बाजार समिती संचालक प्रकाश नामदेव वाणी नगरसेविका सुनीता वाणी यांच्या कन्या जागृती अातीश वरखेडे यांचे सासर नाशिक येथील अाहे. त्या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पाराेळा येथे माहेरी अाल्या हाेत्या. वडील प्रकाश वाणी हे बाजार समितीच्या बैठकीला, तर आई सुनीता वाणी या समर्थांच्या बैठकीला गेल्या हाेत्या. भाऊ किराणा दुकानावर गेला हाेता. घरी फक्त प्रकाश वाणी यांची सून अश्विनी स्वत: जागृती ह्याच होत्या. दुपारी ते १.३० वाजेच्या दरम्यान जागृती यांनी आपला दीड वर्षाचा मुलगा सोहम यास झोळीत टाकले होते. झोळीतून पडू नये, यासाठी झोळीच्या मध्यभागी एक अाेढणी बांधलेली हाेती. दुपारी वाजता जागृती या अापल्या दीड वर्षाच्या बाळाला झाेळीत बघायला गेल्या, तर त्याच्या तोंडाला फेस अाला हाेता. त्यानंतर त्यांनी अारडाअाेरड केली असता भाऊ चेतन हा धावत अाला. त्याने बाळाला उठवण्याचा प्रयत्न केला; पण बाळाने प्रतिसाद दिल्याने त्याला तातडीने डॉ. रवींद्र नावरकर यांच्याकडे नेण्यात अाले. मात्र, श्वास गुदमरून बाळाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घाेषित केले. या घटनेने समाजमन मात्र, सुन्न झाले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...