आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लाेराेफाॅर्म हुंगवून तरुणाकडून दोघांनी लुटली लाखाची राेकड, मेहरूण स्मशानभूमीजवळ घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - क्लोरोफाॅर्म चारुमाल हुंगवून दोघांनी तरुणाकडून लाख हजार रुपये लुटून नेल्याची घटना मेहरूण स्मशानभूमीजवळ सोमवारी दुपारी १२.४५ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
 
रामेश्वर कॉलनीतील तुलसीनगर येथील रेमंड कंपनीचा कर्मचारी सुदर्शन सुरेश चौधरी (वय २१) हा साेमवारी दुपारी १२.३० वाजता घरातील लाख हजार रुपयांची रक्कम घेऊन कापूस जिनिंगला जमा करण्यासाठी दुचाकीने जात हाेता. त्याने सर्व पैसे कापडी पिशवीत ठेवलेले होते,
 
त्याचप्रमाणे डी-मार्टकडून जाताना दुपारी १२.४५ वाजता मेहरूण बागेजवळील स्मशानभूमीजवळ विनाक्रमांकाच्या दुचाकीवर अालेल्या दोघा तरुणांनी त्याला अडवले.
 
त्यानंतर त्या दाेघांनी त्याच्याशी वाद घातला. त्यापैकी एका तरुणाने सुदर्शनच्या तोंडाला क्लोरोफॉर्मचा रुमाल हुंगवला. दुसऱ्याने मोटारसायकलीच्या डिक्कीतील रक्कम काढून चाेरटे घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळानंतर सुदर्शनला शुद्ध अाल्याने तत्काळ एमअायडीसी पाेलिस ठाणे गाठून त्याने घडलेली घटना सांगितली. 
 
तरुणाचीच उलट तपासणी 
सुदर्शनयाने माहिती दिल्यानंतर तत्काळ घटनास्थळावर येऊन पोलिसांनी पाहणी केली. तसेच अाजूबाजूच्या लाेकांना विचारपूसही केली. मात्र, भरदिवसा आणि क्‍लोरोफॉर्म हुंगवून लुटीचा प्रकार घडण्यासारखी परिस्थिती नसल्याने प्रथमदर्शनी तपासात दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी सायंकाळी सुदर्शनचीच उलटत तपासणी सुरू केली. 
बातम्या आणखी आहेत...