आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा: हातेड गावात तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा:  हातेड चोपडा येथील राहुल रमेश पाटील वय ३५ या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत प्राप्त वृत्त असे की, मंगळवारी पहाटे सहा वाजेपुर्वी  राहुल रमेश पाटील (३५ )याने गावाबाहेर उभा असलेला पाण्याच्या टँकरला दोरी बांधून गळफास घेतला त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ नरेंद्र पाटील यांनी त्यास मृत घोषित केले याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात डॉ नरेंद्र पाटील यांचे खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील हे करीत आहेत.

 राहुल पाटील यांना तीन बिघे शेती आहे. त्यावर ५० हजारांपर्यंत सोयासायटीचे कर्ज आहे. कर्ज माफ झाले तरी नवीन कर्ज अजून मिळत नाही पाऊस पडला तरी पेरणी करण्यासाठी पैसे कसे उपलब्ध करू या विवंचनेत त्याने आत्महत्या केली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
  
मयत राहुल पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी व नऊ वर्षाची लहान मुलगी असा परिवार आहे. वडीलानंतर आई, बहीण व राहुल हे तिन्ही वारस होते त्यांची मिळून शेती राहुलच करीत होता.
बातम्या आणखी आहेत...