आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात काेट्यवधींची सिगारेट चाेरी; हिशेब ठेवण्यासाठी नेमला हाेता CA, उलगडले अजब रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिगारेट चोरी प्रकरणातील संशयितांना न्यायालयात घेऊन जाताना जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी. - Divya Marathi
सिगारेट चोरी प्रकरणातील संशयितांना न्यायालयात घेऊन जाताना जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी.
जळगाव - सिगारेट चोरीतील संशयितांनी राज्यभरात कोट्यावधी रुपयांच्या सिगारेट चोरी केल्या आहेत. या चोरीच्या मालासह प्लॉट खरेदी, विक्रीचा हिशेब ठेवण्यासाठी स्वतंत्र कार्यालय, सीएची नेमणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. मुंबई, पुण्यात विविध उद्योग, व्यवसाय असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र, सिगारेट चोरीचा ‘धंदा’ टोळक्याने सुरू केला आहे. 
 
शहरातील चोपडा मार्केटमधील सुरेश पुंडलिक पाटील यांच्या गोदामातून २६ जानेवारी २०१७ रोजी ५० लाख रूपयांच्या सिगारेटसह लाखांची रोकड चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेली होती. या प्रकरणात मुंबईच्या कामोठे पोलिस ठाण्याच्या पथकाने पकडलेले सध्या जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पाच संशयितांना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमधील सिगारेटचे व्यापारी, विक्रेते यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांनी डिलेव्हरी दिलेल्या किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानात चोरी करून कोट्यवधी रूपयांच्या सिगारेट चोरी केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. रविवारी जिल्हापेठ पोलिसांनी यातील मास्टर माईंड तेजस चंपालाल उनेजासह मुकेश मोहन चौधरी उर्फ राजू राठोड, चंपालाल चोगाराम वर्मा, रतनलाल नागाराम डांगी, सुरेंद्र अस्लाराम चौधरी या पाच जणांना न्यायदंडाधिकारी एम.वाय.नेमाडे यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारपक्षातर्फे {उर्वरित. पान 
 
सीसीटीव्ही फुटेज, सीडीआरची तपासणी 
चोरीचेसीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. पोलिस वारंवार फुटेजची पाहणी करीत आहे. त्यातून स्थानिक चोरट्यांचा सहभाग असल्याची खात्री करण्यात येते आहे. तसेच संशयितांपैकी एक जण मोबाइलवर बोलताना दिसून आला आहे. त्यामुळे घटनेच्या रात्री संशयितांनी कोणाशी बोलणे केले? त्याचा या चोरीशी काही संबध आहे का? यासाठी माेबाइलचे सीडीआर मागवण्यात आले आहे. 
 
स्थानिक गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर 
मुंबईतील या टोळक्याला शहरातील स्थानिक गुन्हेगारांनी मदत केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार संशयितांकडून माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. पुणे शहरातील एका मोठा व्यापारी या टोळक्याच्या संपर्कात अाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हा व्यापारीदेखील बेपत्ता झाला आहे. याचप्रमाणे जळगाव शहरात काही धागे-दोरे मिळतात का? याचा शोध पोलिस घेत आहेत. 
 
आणखी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात 
जिल्हापेठ पोलिसांनी या प्रकरणात आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये राजस्थान येथील काही संशयितांचाही समावेश आहे. पोलिस कोठडी दरम्यान जिल्हापेठ पोलिसांना इतर संशयितांची नावे सहभाग तपासण्याचे मोठे आव्हान ठाकले आहे. 
बातम्या आणखी आहेत...