आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारीत केंद्रीय पथक शहरात तपासणी करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी विशेष लक्ष घातलेल्या स्वच्छ भारत अभियानात देशातील ५०० शहरांची जानेवारीच्या पहिल्या अाठवड्यात तपासणी करण्यात येणार अाहे. यात जळगाव शहराचाही समावेश राहणार असून ५८ मुद्द्यांवर केंद्राचे पथक तीन प्रकारची तपासणी करणार अाहे. यासाठी अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित करण्यात अाली अाहे.
देशात संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीची घाेषणा करण्यात अाली अाहे. राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवले जात अाहे. यात वैयक्तिक शाैचालयांवर भर देण्यात येत असून मार्च २०१७पर्यंत शहरातील सर्व लाभार्थ्यांकडे शाैचालय बांधण्याचे काम करण्यात येणार अाहे. दरम्यान, या अभियानांतर्गत देशातील एक लाख लाेकसंख्येपेक्षा माेठ्या ५०० शहरांमध्ये हे अभियान राबवले जात अाहे. शहरातील हागणदारीची स्थिती, साफसफाई, साठवलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे यासारख्या ५८ मुद्द्यांचा समावेश केला अाहे.

केंद्राचे पथक करणार तपासणी
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या माेहिमेत जळगाव मनपाचाही समावेश अाहे. या निमित्ताने नुकतीच मुंबईला बैठक झाली. यात अाराेग्याधिकाऱ्यांसह मनपा अधिकारी उपस्थित हाेते. या वेळी अभियानाचा अाढावा घेण्यात अाला. दरम्यान, ५८ मुद्द्यांवर केंद्रातर्फे नियुक्त केलेले पथक शहरात तपासणी करणार अाहे. यात मनपाने सादर केलेली माहिती, नागरिकांशी संवाद साधणे तसेच प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून २०० गुणांची परीक्षा होईल. या तपासणीत पथकाला ज्या मुद्द्यांवर निकष पूर्ण केल्याची खात्री हाेईल त्यात गुण मिळणार अाहेत. यातच जळगाव शहराचा देशातील ५०० शहरांत क्रमांक ठरणार अाहे.

केंद्राने निश्चित केलेल्या मुद्द्यात कचरा गाेळा करणे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रकल्प अाहे, की नाही हा मुद्दा पालिकेसाठी अडचणीचा ठरणार अाहे. पालिकेचा हंजर बायाेटेकसाेबतचा कायदेशीर वाद लक्षात घेता पालिकेला हा प्रकल्प सुरू करणे फारच कठीण जाणार अाहे. परंतु पालिका त्या दृष्टीनेही विचार करत अाहे. ते शक्य झाल्यास पालिका प्रशासन कंपाेस्ट खताच्या पर्यायांवर विचार करत अाहे. साठवलेल्या कचऱ्याचे खत तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार असल्याचे अायुक्त जीवन साेनवणेंनी सांगितले.

अधिकाऱ्यांना केअारए दिला
स्वच्छतेच्या मुद्द्यावर अागामी दाेन महिने अाराेग्य विभागासाठी परीक्षेचे अाहेत. यात प्रत्येक मुद्द्यावर प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास शहराचा क्रमांक ठरणार अाहे. त्यासाठी अायुक्त साेनवणे यांनी गुरुवारी सायंकाळी अाराेग्य विभाकात सर्व अाराेग्य निरीक्षकांची बैठक घेतली. यात प्रत्येकाला जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. प्रत्येकाने अापल्याला दिलेल्या केअारएच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करण्यात अाल्या. यात स्वच्छतेबाबत जनजागृती प्रबाेधनाचे कार्यक्रमही घ्यावे लागणार अाहेत. घंटागाड्यांचे मार्ग निश्चित करून घराेघरी जाऊन कचरा संकलनावर भर द्यावा लागणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...