आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहरातील 80 किलाेमीटरचा रस्ता 4280 श्रीसेवकांनी केला स्वच्छ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे देशव्यापी स्वच्छता अभियानांतर्गत बुधवारी शहरात स्वच्छता करण्यात अाली. हजार २८० श्रीसेवकांनी अवघ्या काही तासांत ११,७०० चाैरस किलाेमीटर क्षेत्रफळ असलेल्या जळगाव शहरातील तब्बल ८० किलाेमीटरचे रस्ते स्वच्छ करत १९८.७५ टन कचरा गाेळा केला. त्यामुळे बुधवारी शहरातील कानाकाेपरा चकाचक दिसत हाेता. 
 
धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जळगाव समितीतर्फे जळगाव शहरासह, जामनेर, धरणगाव अाणि एरंडाेल शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात अाले. 
 
एकूण हजार ९८२ श्रीसेवकांनी या अभियानात सहभाग नाेंदवला. यातील हजार २८० श्रीसेवकांनी जळगाव शहराची स्वच्छता केली. माेहिमेत चार शहरांमध्ये एकूण १३४.५ किलाेमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून जिल्ह्यातून ३७९.८५ टन तर शहरातून १९८.७५ टन कचरा गाेळा करण्यात अाला. जळगावात सकाळी ७.३० वाजेपासून अभियानास सुरुवात झाली. श्रीसेवकांनी हातात झाडू, कुदळ, टाेपली फावडे घेऊन शहरातील कानाकाेपरा स्वच्छ केली. 
 
या अभियानात अामदार सुरेश भाेळे, महापाैर नितीन लढ्ढा, मनपा अायुक्त जीवन साेनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, नगरसेवक नितीन बरडे हे देखील उत्साहाने सहभागी झाले हाेते.
 
अभियानांतर्गत शासकीय कार्यालये, शासकिय रुग्णालये, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बीएसएनएल कार्यालय, पाटबंधारे विभाग, शहरातील सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात अाले. अभियानात संकलित करण्यात अालेला कचरा खासगी वाहनांतून महापालिकेच्या कचरा डेपाेमध्ये टाकण्यात अाला. 
 
स्वच्छते वेळी घेण्यात आली विशेष काळजी 
अभियानात सहभागी झालेल्या श्रीसेवकांनी विशेष काळजी घेतल्याचे दिसून अाले. प्रत्येक श्रीसेवकाच्या हातात माेजे ताेंडाला मास्क लावले हाेते. तसेच गाेळा करण्यात अालेला कचरा तत्काळ ट्रॅक्टरमध्ये भरण्यात येत हाेता.
 
प्रतिष्ठानतर्फे यापूर्वी १६ नाेव्हेंबर २०१४ला देखील असे भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात अाले हाेते. या अभियानाची नाेंद लिम्का बुक रेकाॅर्डमध्ये करण्यात अाली हाेती. बुधवारीदेखील याच धर्तीवर महाराष्ट्रासह देशभरात स्वच्छता अभियान राबवण्यात अाले. 
 
शिस्त अन् सूक्ष्म नियाेजन 
स्वच्छता करताना श्रीसेवकाने अगदी सूक्ष्म नियाेजन केले हाेते. त्यानुसार प्रत्येकाने कुठलाही हेवा दावा दाखविता शिस्तीत काम केले. सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन महापालिकेच्या मदतीने स्वच्छता अभियान राबवले तर शहर खरंच ‘स्वच्छ अाणि सुंदर’ दिसेल. 
 
जलसंपदा मंत्र्यांचाही सहभाग 
जामनेर शहरात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्षा साधना महाजन सहभागी झाले. या ठिकाणाहून देखील सर्वाधिक कचरा गाेळा करण्यात अाला. धरणगावमध्ये नगराध्यक्ष सलीम पटेल, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, मुख्याधिकारी सपना वसावा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...