आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएमचा ‘डिजिटल’ उतारा, शेतमालाच्या भावाबाबत घोषणा नाही; शेतकऱ्यांची निराशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कापसाच्या भावासंदर्भात काहीतरी पदरात पडेल या अाशेने मुख्यमंत्र्यांचे भाषण एेकण्यासाठी अालेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना सभेत बसलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना थांबवत कापसाची अाठवण करून दिली. त्यांनी समयसूचकतेने चेंडू मुख्यमंत्र्यांच्या काेर्टात टाेलावला. मुख्यमंत्र्यांनी मात्र, शेतकऱ्यांना डिजिटल क्रांतीचे डाेस दिले. गाव, शाळा, मार्केटदेखील डिजिटल करण्याची घाेषणा त्यांनी केली. पालकमंत्री पांडुरंग फुडकरांनीदेखील भाषणात कापूस, साेयाबीनला भाव देण्याची मागणी केली.

जामनेर शहरातील विविध विकासकामांचे उदघाटन अाणि महाराजस्व अभियानानिमित्त जामनेर येथे फडणवीस यांच्या उपस्थितीत शिबिराचे अायाेजन करण्यात अाले हाेते. कार्यक्रमात शेतकरी अाणि अन्य मंत्र्यांना मुख्यमंत्र्याकडून कापसाच्या प्रश्नावर ठाेस निर्णय वा घाेषणेची अपेक्षा हाेती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी निराशा केली. पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या शासनावर अासूड अाेढत त्यांनी शैक्षणिक डिजिटल क्रांतीबाबत विचार मांडले. डिजिटलचा प्रयाेग शाळा, गाव, अाराेग्य केंद्रापर्यंत अाणि शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचवून २०१८ पर्यंत संपूर्ण राज्य डिजिटल करण्याची घाेेषणा त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी ई-मार्केटही प्रणाली त्यांच्या माेबाइलवर देण्यात येईल.
व्यासपीठावर पांडुरंग फुंडकर, गिरीश महाजन, स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लाेणीकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अल्पसंख्याक अायाेगाचे अध्यक्ष महम्मद हुसेन खान, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रयाग काेळी, अामदार हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ, सुरेश भाेळे, उन्मेष पाटील, किशाेर पाटील, चंद्रकांत साेनवणे, किशाेर पाटील, महापाैर नितीन लढ्ढा उपस्थित होते.

कमी भाव दिल्यास फाैजदारी गुन्हे
कापूस अाणि साेयाबीनच्या कमी भावासाठी व्यापारी अाणि दलाल जबाबदार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यापुढे हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर फाैजदारी गुन्हे दाखल करा, असे अादेश त्यांनी दिले.

मार्केट स्वत: तयार करावे
शासन प्रक्रिया उद्याेगांवर भर देत अाहे. साखर कारखाने उभे राहिल्याने मार्केट ऊस उत्पादकांच्या मर्जीवर चालते. कापूस प्रक्रिया उद्याेग उभे केल्यास मार्केटमध्ये कापूस उत्पादकांची मर्जी चालेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे.....
> गेल्या सरकारने शिक्षणाचे बाजारीकरण, व्यापारीकरण केले.
> अामची सत्ता येण्यापूर्वी महाराष्ट्र शिक्षणात १५ व्या क्रमांकांवर हाेता, अाता तिसऱ्या क्रमांवर अाहे.
> अाधीच्या सरकारने वाघिणीचे दूध पाणी टाकून पाजले
> डिजिटल क्रांतीने शहर-ग्रामीण असा भेद मिटवू
> गुलाबराव पाटील हे अामच्या मंत्रिमंडळातील तंेंडुलकर अाहेत
> कलेक्टर अाॅफिसपेक्षा जामनेर पंचायत समितीची इमारत सुंदर, मंत्रालयही शिप्ट करणे शक्य
> जामनेरची जिल्हा परिषद उर्दू,मराठी शाळा राज्यात सर्वाधिक चांगली
> शेतकऱ्यांसाठी डिजिटल, ई-मार्केट देऊ
> राज्यात ११ ठिकाणी टेक्स्टाइल पार्कची उभारणी
> जलयुक्तमुळे दाेन वर्षात जळगाव ‘जलगाव’ करू
> पूर्वी लाेक सरकारकडे जायचे, अाता सरकार लाेकांकडे चालून येते
पुढे वाचा, खडसेंचा मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारीचा पाढा..
बातम्या आणखी आहेत...