आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे : सामूहिक आत्महत्या; एकाला केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शिंदखेड तालुक्यातील नरडाणा येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणाने आता कलाटणी घेतली आहे. पोलिस अण्णा या व्यक्तीनंतर गुरुवारी या प्रकरणी भिला भील याला संशयावरून अटक करण्यात आली. वैशालीच्या तक्रारीत उल्लेख असलेला अण्णा भिला एकच व्यक्ती आहे. शिवाय आसारामच्या मृतदेहाजवळ मिळून आलेल्या चिठ्ठीत त्याचा उल्लेख होता, असा गौप्यस्फोट पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी फरार असलेल्या दोघांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 
नरडाणा शिवारात एक्स्प्रेससमोर स्वत:ला झोकून देऊन आसाराम भील त्यांची मुले मोठाभाऊ शिवदास यांनी आत्महत्या केली होती. तर आसारामची पत्नी विठाबाई मुलगी वैशाली हिने कोरड्या विहिरीत उडी घेतली होती. या घटनेची एकमात्र साक्षीदार असलेल्या वैशालीवर उपचार सुरू आहे. तिच्या जबाबावरून सोमवारी नरडाणा पोलिस ठाण्यात अमळनेर तालुक्यातील बाम्हणे येथील अण्णा भीलवर गुन्हा दाखल झाला. अण्णाने गावातून बहिष्कृत केल्यामुळे मनस्ताप झाला. याच मनस्तापातून सामूहिक आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती; परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पाेलिस तपासानेही रंग बदलला आहे. या प्रकरणात आता भिला चंद्रा भील (५०, रा. बाम्हणे) याला अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोन जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अण्णा भिला हे दोघे एकच व्यक्ती आहे. तसेच आसारामच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी होती. या चिठ्ठीतही भिलाचा उल्लेख आहे. तसेच अन्य दोन जणांची नावेही त्यात नमूद करण्यात आली आहेत. भिला यास अटक केली असून, त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला सोमवार (दि.२०) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयात देण्यात आले आहे. पोलिस अधिकारी भगवान मथुरे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. 
 
चिठ्ठी तज्ज्ञांकडे 
-
मृतदेहाजवळ अाढळलेली चिठ्ठी अासारामएेवजी त्यांच्या मुलाने लिहिलेली असू शकते. त्यामुळे पाेलिस प्रशासनाने चिठ्ठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविली आहे. यातून चिठ्ठी नेमकी कोेणी लिहिली याचा उलगडा होणार आहे. तपासासाठी ही बाब महत्वाची ठरेल. दरम्यान याच चिठ्ठीत आणखी दोघांची नावे आहेत. त्यांचा शोध घेण्यात सध्या पाेलिस गुंतले आहेत.
-भगवानमथुरे, सहायक पोलिस निरीक्षक, नरडाणा 
 
काय घडले दिवसांत 
याप्रकरणी सुरुवातीला चक्क पोलिसांवर आरोप केला जात होता; परंतु यानंतर मात्र वैशालीच्या जबाबाचा आधार घेण्यात आला. दोन महिन्यांपूर्वीच्या घटनेमुळे मनस्ताप होऊन अात्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद झाले. त्यामुळे पोलिसांवरील आरोप सौम्य होऊन अण्णा, भिलावर रोष व्यक्त होऊ लागला. यानंतर अवघ्या तीन दिवसांत अण्णाचे नाव मागे पडून भिलाचे नाव समोर आले. तसेच अण्णा भिला एकच व्यक्ती असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी पोलिसांना अथक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे तपास भरकटला असल्याचा आरोप होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...