आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी मंगलची अत्यंत साधेपणाने मांडवपरतणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कोणताही बडेजाव करता अत्यंत साधेपणाने मंगलची मांडव परतणी साेमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी मंगलसह तिच्या सासरच्या मंडळींचे आदरातिथ्य केले. या कौटुंबिक सोहळ्याला अधिकाऱ्यांसह मान्यवरांनी हजेरी लावली. 

रावेर तालुक्यातील भाटखेडा येथील योगेश या मूकबधिर युवकाशी ३० एप्रिल रोजी मंगलचा विवाह पार पडला होता. जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी मंगलचे कन्यादान केले होते. त्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना मांडव परतणीचे स्वत: निमंत्रण दिले होते. त्यानुसार मंगल, योगेश, तिचे सासरे देविदास जैन, सासू नंदा जैन, रवींद्र जैन, वसंत जैन, ज्योती जैन, वृंदा जैन, प्रताप जैन, विकास जैन, अनिता जैन, मंगलची ननंद मनीषा जैन आदी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी औक्षण करून स्वागत केले. तसेच शंकरबाबा पापळकर यांनीही कार्यक्रमास येणाऱ्या मान्यवरांचे प्रवेशद्वारावर स्वागत केले. 

आहेर देऊन केला सन्मान 
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगलच्या सासऱ्यांना आहेर केला. तर तिच्या सासरच्या मंडळींनीही जिल्हाधिकाऱ्यांना आहेर केला. हा सोहळा बघण्यासाठी छोटीशी स्क्रीन लावली होती. हळुवार संगीत सुरू होते. कार्यक्रमाला दीपस्तंभच्या दिव्यांग शाळेतील ६५ मुले तसेच खासदार ए.टी.पाटील, एसपी दत्तात्रेय कराळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, पाेलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, बच्चनसिंग, उपवनसंरक्षक एम.आदर्शकुमार रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, प्रांताधिकारी जलज शर्मा, अरविंद अंतुर्लीकर, मनीषा खत्री, अॅड.सुशील अत्रे, युसूफ मकरा, गनी मेमन, अनिल कांकरिया, डाॅ.राजेश पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, प्रशांत छाजेड, डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, सीमा पाटील, कंचन कांकरिया, रमन जाजू, सूरज जहागिरदार, हेमा बियाणी, योगेश भोळे, संगीता पाटील उपस्थित होते. 
 
आमरस पुरणपोळीसह विविध मेनू 
स्नेहभोजनामध्ये स्टार्टर, पनीर चिल्ली, व्हेज मंच्युरियन, डाेसा, आमरस पुरी, पुरण पोळी, हाडवी गुजराथी डिश, सॉफ्ट ड्रिंक, नमकीनबरोबर आइस्क्रीमचीही व्यवस्था करण्यात आली होती. मांडवपरतणीनंतर सर्वांनी स्नेहभोजन केले. मांडवपरतणीचा कार्यक्रम संपल्यानंतर मंगल, योगेशसह सर्व सासरकडील मंडळी रावेरला रवाना झाली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...