आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर करणार भुसावळातील प्रभागांचा दौरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकाऱ्यांकडे समस्या मांडताना संगीता देशमुख. - Divya Marathi
जिल्हाधिकाऱ्यांकडे समस्या मांडताना संगीता देशमुख.
भुसावळ - शहरातील रखडलेली नालेसफाई, रस्ता दुरुस्ती, पथदिवे, अस्वच्छता, सत्ताधारी भाजप नगरसेवकांकडून होणारे अतिक्रमण यासंदर्भात जनआधारच्या नगरसेविका संगीता देशमुख यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या समस्यांची गंभीर दखल घेवून जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी भुसावळचा प्रभागनिहाय पाहणी दौरा करण्याचे आश्वासन दिले आहे. 
 
जनआधारच्या नगरसेविका संगिता देशमुख, सिद्धीविनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख आदींनी मंगळवारी जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर यांची जळगाव येथे भेट घेवून म्युनिसीपल मार्केटमधील अतिक्रमण, जुलै महिना उजाडूनही रखडलेली नालेसफाई, मुख्याधिकारी बाविस्करांनी खासगी वाहनामध्ये पालिकेच्या नावावर भरलेले इंधन आदी समस्यांची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी भुसावकरांसाठी वेळ देवून स्वत: पाहणी करावी, अशी विनंती केली. या सर्व मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी पाऊण तास चर्चा केली. 
 
गांभीर्य व्यक्त केले 
भुसावळकरांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. त्यांनी स्वत: पाहणी करण्याचे आश्वासन दिले. रस्ते, नगरसेवकांचे अतिक्रमण, रखडलेली नालेसफाई, रस्त्यांची स्थिती, गटारी, पथदिवे, पालिकेचा कारभार याबाबत माहिती ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले.
संगीता प्रदीप देशमुख, नगसेविका, भुसावळ 
 
मासिक सभेकडे दुर्लक्ष 
पालिकेची मागील सभा १२ मार्च रोजी घेण्यात आली होती. १२ जुलैपर्यंतचा चार महिन्यांचा काळ उलटूनही सत्ताधाऱ्यांनी पुढील सर्वसाधारण सभेचे नियोजन केले नाही. सर्वसाधारण सभेचे प्रोसेडिंग इतिवृत्त आतापर्यंत लिहिलेले नाही. याबाबत नगरसेविका देशमुख यांनी तक्रार केली. याबाबींवर जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्य व्यक्त केले. 
बातम्या आणखी आहेत...