आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवली आक्रमकतेची झलक; पोलिसांना हुलकावणी देत जाळला मोदींचा पुतळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकाऱ्यांतर्फे निवेदन स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके. - Divya Marathi
जिल्हाधिकाऱ्यांतर्फे निवेदन स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके.
जळगाव - मोदी सरकारची फसलेली नोटबंदी आणि त्यामुळे जनतेला झालेल्या त्रासाला वाट मोकळी करून देण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा काढून जिल्हा प्रशासन अाणि पोलिसांना जोरदार झटका दिला. तगडा बंदोबस्त असताना देखील पोलिसांना हुलकावणी देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा पुतळा जाळला. त्यानंतर काँग्रेसचे निवेदन घेण्यास नेहमीच नकार देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविराेधात जाेरदार घोषणाबाजी करत प्रवेशद्वारावर चढून अात प्रवेश केला. जिल्हाधिकारी भाजप नियुक्त असल्याचा अाराेप करीत घोषणाबाजीही केली. काँग्रेसच्या आक्रमक अांदाेलनाचा जाेर अनपेक्षितपणे वाढल्याने प्रशासन अाणि पोलिसांच्या नाकीनऊ अाले होते. शहरात शुक्रवारी दिवसभर काँग्रेसच्या आंदोलनाची चर्चा हाेती. माेदी यांचा पुतळा जाळणाऱ्या अाणि पाेलिसांशी बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
जळगाव जिल्हा काँग्रेसने केंद्रीय निरीक्षक मनाेज राठाेड यांच्या नेतृत्वात शुक्रवारी शहरात जन अाक्राेश माेर्चा काढला. मोदी सरकारविराेधात काढण्यात अालेला हा माेर्चा महात्मा गांधी उद्यानापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्वच नाही, अशी हेटाळणी जिल्ह्यातील भाजप नेते वारंवार करीत असतात. त्यामुळेच माेदी सरकारविराेधात काढलेला माेर्चा काँग्रेसच्या इतर अांदाेलनांप्रमाणे साेपस्कार पूर्ण करणारा असेल, असे गृहित धरून पाेलिसांनीदेखील दुर्लक्ष केले हाेते. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाेलिसांची नजर चुकवून पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाळला. जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असताना महानगर कार्याध्यक्ष डाॅ. राधेश्याम चाैधरी, तालुका अध्यक्ष संजय वराडे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनीदेखील जिल्हाधिकारी कार्यालयातील १० फुटांच्या प्रवेशद्वारावर चढून अात गेल्या. कार्यालच्या अावारात गर्दी झाल्याने पाेलिसांनी अतिरिक्त पाेलिसांची तुकडी मागवून अांदाेलनकर्त्यांना बाहेर काढले. 

जिल्हाधिकाऱ्यांविराेधात जोरदार घाेषणाबाजी 
काँग्रेसनेयापूर्वी काढलेल्या माेर्चाचे देखील जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी एकदाही निवेदन स्वीकारले नाही. जिल्हाधिकारी भाजप विचारसरणीच्या असून काँग्रेसचे निवेदन मुद्दाम घेत नसल्याचा अाराेप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. प्रदेश सचिव डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, डाॅ. राधेश्याम चाैधरी, उदय पाटील, याेगेद्रसिंग पाटील, वीरेंद्रसिंग पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या देत घाेषणाबाजी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घ्यावे, असा अाग्रह धरला. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी बाहेर येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, महानगर अध्यक्ष डाॅ. ए. जी. भंगाळे, कार्याध्यक्ष डाॅ. राधेश्याम चाैधरी, उदय पाटील, भगतसिंग पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलाेचना वाघ यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांतर्फे निवेदन देण्यात आले. 
 
तीन ठिकाणी विभागले कार्यकर्ते 
तीन ठिकाणी विभागले गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अांदाेलनस्थळी पाेलिसांना चकवा दिला. काही पदाधिकारी निवेदन देण्यासाठी अात अांदाेलन करीत हाेते, काहीही गेटवर चढून अात शिरण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी अॅड. अविनाश भालेराव, याेगेंद्रसिंग पाटील, राजू सुवर्णे, परमेश्वर टिकरे, ज्ञानेश्वर पाटील, अजय गवळे, बाबा देशमुख, पंकज पाटील, पंकज वाघ, तानाजी पाटील, अमाेल राजपूत, अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदीं यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पाेलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...