आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच नगरसेवक भाजपमध्ये; मनपात सत्ताधारी राष्ट्रवादीला झटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्र्यांसह नगरसेवक सोनल शिंदे, भिकन वराडे यांच्यासह मंत्री डॉ. भामरे. - Divya Marathi
मुख्यमंत्र्यांसह नगरसेवक सोनल शिंदे, भिकन वराडे यांच्यासह मंत्री डॉ. भामरे.
धुळे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सोनल शिंदे, उपमहापौर फारुक शहा यांच्यासह शिवसेनेची एक नगरसेविका दोन अपक्ष नगरसेवकांनी बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. 
 
महापालिकेत अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. स्थायी समितीसह इतर सर्व समित्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. त्यातून पक्षातील नगरसेवकांमध्ये दोन गट पडल्याची चर्चा होती. महापौर स्थायी समिती सभापती निवडीपासून ही खदखद सुरू आहे. अनेकवेळा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महासभेत एकमेेकांवर अाराेप-प्रत्यारोप केले. स्थायी समितीचे तत्कालीन सभापती सोनल शिंदे यांना सहा महिन्यांसाठी सभापतिपद देण्यात आले होते; परंतु त्यांनी एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला. या मुद्द्यावरून नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली हाेती. त्यातून काही महिन्यांपासून माजी सभापती सोनल शिंदे हे भाजपच्या संपर्कात होते. भाजपच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी यांच्याकडे भारतमाता पूजनासाठी गेल्याची चर्चा झाली होती. दुसरीकडे माजी उपमहापौर डॉ.फारुक शहा अपक्ष नगरसेवक फिरोज शेख रश्मी बानो जुलाह हेदेखील भाजप पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेविका शकुंतला जाधव, भिकन वराडे सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी बुधवारी पिंपरी-चिंचवड येथे भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जिल्हा प्रभारी आमदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, हिरामणगवळी आदींसह मान्यवर उपस्थित हाेतेे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी कांॅग्रेसला फटका बसला असून, राष्ट्रवादी कांॅग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येत आहे. खासदार सुप्रिया सुळे काही दिवसांपूर्वी दौऱ्यावर आल्या होत्या. त्या वेळी त्यांनीही पदाधिकाऱ्यांना कठोर शब्दात सूचना दिल्या होत्या. दरम्यान, अजूनही काही जण पक्ष सोडण्याच्या तयारी असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी कांॅग्रेसमधून याआधी सतीश महाले त्यांच्या पत्नी मनीषा महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला यापूर्वीही झटका बसला होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...