आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: महिलादिनी लाचखाेर महिला अभियंत्यास अटक, महिलेकडूनच घेतली हजाराची लाच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- भुसावळ पंचायत समितीतील गृहनिर्माण विभागातील महिला अभियंता भाग्यश्री शिंदे यांना एक हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी रंगेहाथ पकडले. महिला दिनी महिलेकडूनच शिंदे यांनी लाच घेतली. त्यांना अटक करण्यात अाली अाहे. 

कंडारी येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावाने इंदिरा अावास याेजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले हाेते. या घरकुलाच्या अनुदानाची रक्कम शासनाकडून तीन टप्प्यात दिली जाते. त्यानुसार तक्रारदाराला पहिले दाेन हप्ते पंचायत समितीकडून मिळाले. मात्र, मंजूर अनुदानाचा तिसरा हप्ता घेण्यासाठी वारंवार पंचायत समितीत जाऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तक्रारदाराने गृहनिर्माण अभियंता भाग्यश्री शिंदे यांची भेट घेतली असता, अनुदानाचा तिसरा हप्ता हवा असल्यास दाेन हजार रुपये लाचेची मागणी झाली. मात्र, तडजोडीअंती एक हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे गाऱ्हाणे मांडले. त्यानुसार बुधवारी एसीबीने सापळा लावला. त्यात भाग्यश्री शिंदे यांना तक्रारदाराकडून एक हजार रुपये लाच घेतांना रंगेहाथ पकडले. 
बातम्या आणखी आहेत...