आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे येथे विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची अात्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- बिलाडी राेडवरील स्टाॅर्च फॅक्टरीनजीक शेतातील विहिरीत प्रेमीयुगुलाने उडी घेऊन अात्महत्या केली. नंदुरबार तालुक्यातील खामगाव येथील रहिवासी असलेला कल्पेश सुरेश नंदन (वय २०) अाणि हिमानी (वय २०) या दाेघांनी दुपारी बिलाडी राेडवरील चंद्रकांत केले यांच्या विहिरीत उडी घडली.
 
शेतातील काही लहान मुलांनी त्यांना विहिरीत उडी घेताना पाहिले. त्यांनी अारडाअाेरड केल्याने अाजूबाजूच्या लाेकांनी धावपळ करीत दाेघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मुलाचा मृतदेह बिलाडी येथील पाेलिस मित्रांनी विहिरीत उडी घेऊन बाहेर काढला.
 
तर मुलीचा मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राज्य अापत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने दाेन तास शाेधमाेहीम घेऊन बाहेर काढला. मृत कल्पेश नंदन हा नेताजी काॅलेजला तिसऱ्या वर्षाचे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत हाेता. 
बातम्या आणखी आहेत...