आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने चार वेळा वार करून केले गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - क्रिकेट स्पर्धेच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ घडली. हल्लेखाेरांनी तरुणाच्या पोटात चार वेळा चाकूने वार केल्याने ताे गंभीर जखमी झाला आहे. तसेच तरुणाजवळील ३१ हजार रुपये हिसकावून हल्लेखाेरांनी पळ काढला. या प्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
मेहरूण परिसरातील गुरुदत्तनगरातील फिरोज खान नईम खान (वय ३८) हा बांधकामाचा मजूर अाहे. त्याने ते ११ एप्रिलदरम्यान रायसोनीनगरात माैलाना अब्दुल कलाम आझाद वेल्फेअर एज्युकेशन क्रिकेट स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला हाेता. त्यात विजेत्याला ५१ हजारांचे, तर उपविजेत्यास ३१ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. स्पर्धेत तांबापुरा संघ आयोजक फिरोज याचा संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले होते. मात्र, काही कारणास्तव अंतिम सामना होऊ शकला नाही. त्यामुळे फिरोज खान तांबापुरा संघाचे खलील उस्मान यांच्यात अंतिम सामना का होत नाही यावरून वाद झाला होता. २२ दिवसांनंतर गुरुवारी सकाळी फिरोज हा महामार्गावरील एका पेट्रोल पंपांजवळ कामगारांसोबत इतर कामगारांची जोशीवाड्यातील बांधकामावर जाण्यासाठी वाट पाहत होता. त्याच वेळी खलील उस्मान हा सात ते आठ जणांना घेऊन आला आणि फिरोज याच्याकडून बक्षिसाच्या ५१ हजार रुपयांसाठी तगादा लावला. अंतिम सामना झाला नसून त्याचे पैसे देऊ शकत नसल्याचे फिरोज याने सांगताच खलील याने वाद घातला. यानंतर खलील त्याच्यासोबत आलेल्या तरुणांनी फिरोज याला मारहाण करून पोटावर चारवेळा चाकूने वार केले. त्याच्याजवळ असलेले ३१ हजार रुपये हल्लेखोरांनी हिसकावून पळ काढला. त्यानंतर अफसर शेख, आसिफ शेख, जाकीर ठेकेदार, विठ्ठल यांनी फिरोज याला रक्तबंबाळ अवस्थेत उचलून रिक्षात बसवले आणि सिव्हिलमध्ये दाखल केले. या ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी तरुणाचे जबाब नोंदवून घेतले. 
बातम्या आणखी आहेत...