आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोऱ्हा कापल्यामुळे तणाव; वेळीच हस्तक्षेपामुळेे परिस्थिती नियंत्रणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॅबमध्ये तपासणी करताना डॉक्टर. - Divya Marathi
लॅबमध्ये तपासणी करताना डॉक्टर.
जळगाव - बकरी ईदनिमित्ताने गोऱ्हा कापल्याची घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजता उस्मानिया पार्क परिसरात घडली. या घटनेमुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबंधितांवर शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
दोन वर्षांपूर्वी गोवंश हत्या बंदीचा कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे; त्यामुळे गोवंश हत्या करण्यावर बंदी आहे. असे असताना देखील शनिवारी बकरी ईदनिमित्त उस्मानिया पार्कमधील शेख नावेद शेख नाजीर जमिल कुरेशी या दोघांनी चार वर्षे वयाचा एक गोऱ्हा कापला. सकाळी १०.३० वाजता काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उस्मानिया पार्कमध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर काही वेळ या परिसरात तणाव निर्माण झाला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यांनी दोन्ही समुदायांच्या लोकांना तंबी देत गर्दी पांगवली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मिलिंद घेटे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी सुरक्षा सुधारणा कायदा अधिनियम २०१५चे कलम ५(क)चे उल्लंघन ९(अ) प्रमाणे नावेद जमिल यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी नावेद याला अटक केली आहे. तर जमिल बेपत्ता झाला आहे. त्याच्याकडून गोऱ्ह्याचे मास कातडी हस्तगत करण्यात आली असून ती तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. 
 
तीन दिवसांत दुसरी अप्रिय घटना 
शहरात गुरुवारी कोळीपेठ भागात रिक्षाचा धक्का मंडपाला लागल्यामुळे गणपतीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे सुमारे चार तास तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर शनिवारी गोऱ्हा कापल्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली. काही संघटनांनी यात सहकार्य केल्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत झाली. 
 
...असा आहे कायदा 
दोन वर्षांपूर्वी गोवंश हत्या बंदीचा कायद्यात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. संबंधितांवर महाराष्ट्र प्राणी सुरक्षा सुधारणा कायदा अधिनियम २०१५चे कलम (क)चे उल्लंघन ९(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास संशयितांना सात वर्षांपर्यंत कारावास दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 
 
गणेशमूर्ती विटंबनप्रकरणी आणखी एकाला अटक 
जळगाव शहरातील कोळीपेठेतील झुंझार बहुद्देशीय मित्र मंडळाच्या मंडपाला धक्का लागून गणेशमूर्तीची विटंबना झाली होती. याप्रकरणी शनिवारी पोलिसांकडून संशयित तनवीर शेख करीम याला अटक करण्यात आली. तसेच घटनेच्या दिवशी शेख आसिफ शेख अजुमुद्दीन, अजुमुद्दीन शेख गुलाम हुसेन, शेख वसीम शेख अजुमुद्दीन, शेख यासिन शेख अजुमुद्दीन या चौघांना अटक करण्यात आली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता सप्टेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.अनिल गायकवाड यांनी काम पाहिले. 
बातम्या आणखी आहेत...