आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : नगरसेवक पुत्राने केली मारहाण; तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
जळगाव- मौलाना लोकांना नोटीस का दिल्या? या कारणावरून नगरसेवक पुत्रासह तिघांनी एकास मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात नगरसेवक पुत्राविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पिंप्राळा आझाद-नगर येथील अहमद खान युसूफ खान (वय ४०) यांनी मौलाना यांना नोटीस देवून हिशेब मागितला होता. याचा राग आल्यामुळे नगरसेवक पुत्र अयुब खान रसूल खान उर्फ पठाण, शेख रफीक वेल्डींगवाला बिहारी, शेख रहिम शेख अमीर, जेनुद्दीन शेख सलीम (सर्व रा. शाहुनगर) यांनी शनिवारी दुपारी १२.३० वाजता अहमद खान यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केली. या मारहाणीत अहमद खान यांना दुखापत झाली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलिसात मारहाण करणाऱ्या तिघांच्या विरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषोत्तम वागळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.