आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीस विकणाऱ्या पतीला पोलिस कोठडी, एलसीबीच्या पथकाने भुसाावळात केली होती अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुक्ताईनगर - पत्नीला एक लाख रुपयात विकणाऱ्या आरोपी पतीला रविवारी मुक्ताईनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
 
तालुक्यातील चिंचोल येथील माहेर असलेल्या विवाहितेला सुरत येथे कामासाठी घेऊन गेलेल्या विवाहितेला पती मोहन सोनवणे (रा.वरणगाव) याने गुजरामतध्ये विकले होते. याप्रकरणी ऑगस्टला विवाहितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी वेगाने तपास करून नारंगभाई मेर (रा.रनकोट) अाणि दलाल रसूलभाई जोगीयानी यांना सापळा रचून अटक केली होती. या दोघांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी मिळालीआहे. तर जळगाव येथील एलसीबीच्या पथकाने मुख्य आरोपी मोहन सोनवणेला भुसावळातील ढाब्यावरून शनिवारी अटक केली होती. त्याला रविवारी पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 
 
या प्रकरणातील अन्य तीन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सोमवारी पोलिसांचे पथक रवाना होणार आहे, अशी माहिती मुक्ताईनगरचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सांगळे यांनी बोलताना दिली. 
बातम्या आणखी आहेत...