आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 2 हजार 44 कोटींचे पीककर्ज थकित, बँकांचा थकबाकी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका मिळून जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल अग्रणी बँकेच्या महाव्यवस्थापकांकडून जिल्हाधिकारी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल लाख ४५ हजार २२४ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे व्याजासह एकूण हजार ४४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
कर्जमाफीच्या अनुषंगाने शासनाने १७ जूनपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची सात प्रपत्रांमध्ये अग्रणी बँक जिल्हा उपनिबंधकांकडून माहिती मागविली होती. मात्र, ही माहिती गोळा करण्यासाठी बँकांना विलंब लागला. सर्व कर्जदारांमधून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती वेगळी काढण्यात आली. शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर केलेले आहे. मात्र, त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाने अल्प, मध्यम दीर्घ मुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती जिल्ह्यातील बँकांकडून मागविली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागविली होती, तर अग्रणी बँकेच्या महाव्यवस्थापकांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागविली होती. सात प्रपत्रांमध्ये ही माहिती भरण्यात आली आहे.
 
३१ जूनपर्यंतची माहिती
बँकांनी३१ जून २०१६पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे पाठविली आहे. या तारखेपर्यंत जिल्ह्यातील लाख ४५ हजार २२४ शेतकऱ्यांकडे अल्प, मध्यम दीर्घ मुदतीचे हजार ४४ कोटी रुपयांचे कर्ज व्याजासह थकीत आहे. याबाबत जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांना अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक सुनील दामले यांनी अहवाल पाठविला आहे.
बातम्या आणखी आहेत...