आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षात गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट, दाेन जखमी; सुदैवाने प्राणहानी टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटामुळे रिक्षाचे झालेले नुकसान पाहण्यासाठी जमलेली गर्दी. - Divya Marathi
स्फोटामुळे रिक्षाचे झालेले नुकसान पाहण्यासाठी जमलेली गर्दी.
 
जळगाव - रिक्षामध्ये घरगुती सिलिंडरमधून गॅस भरत असताना सिलिंडरचा स्फाेट झाला. यात दाेन जण जखमी झाले. तसेच परिसरातील काही घरांचे नुकसान झाल्याची घटना साेमवारी सायंकाळी ७.०५ वाजता हरिविठ्ठलनगरातील मारुती मंदिर चाैकात घडली. परिसरातील नागरिकांच्या समयसूचकतेमुळे सुदैवाने काेणतीही प्राणहानी झाली नाही. 
 
हरिविठ्ठलनगरातील मारुती मंदिर चाैकात रिक्षाचालक नितीन सुभाष बारी (वय २१) घरगुती सिलिंडरमधून रिक्षाच्या (क्र. एमएच-१९-व्ही-६९४९) सिलिंडरमध्ये गॅस भरत हाेता. गॅस भरताना मल्टिपल व्हाॅल्व्हमधून त्याने एअर काढली. त्या वेळी बाजूलाच १० फुटाच्या अंतरावर तुळशी वृंदावनाजवळ दिवा सुरू हाेता. एअर काढल्याने दिव्याजवळील जागेने अचानक पेट घेतला. नितीन याला काही रिक्षात गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट कळण्याच्याअातच सिलिंडरसह रिक्षानेही पेट घेतला, त्यात नितीनचे दाेन्ही हात भाजले. 
 
सिलिंडरचे तुकडे उडाले १०० मीटरपर्यंत 
सिलिंडरनेपेट घेतल्यानंतर नितीनसह अाजूबाजूला राहणारे नागरिक तत्काळ बाजूला झाले. नितीन बारी याच्या घराच्याच बाजूलाच जळगाव गॅस एजन्सीचे गॅस मेकॅनिक शशिकांत शिवाजी मराठे (वय ३२) हे राहतात. घटना घडली त्या वेळी ते घरीच हाेते. मराठे यांच्यासह लक्ष्मण धनगर, महेंद्र मिस्त्री, गोरख महाराज, पिंटू बारी यांनी परिसरातील नागरिकांना बाजूला करून रिक्षाजवळ काेणालाही जाऊ दिले नाही. त्यानंतर काही मिनिटांतच सिलिंडरचा स्फाेट झाला. त्यामुळे सुमारे दाेन किलाेमीटरपर्यंतचा परिसर दणाणून गेला. सुदैवाने सिलिंडर उलटे ठेवलेले असल्याने त्याचा एक भाग हवेत उडाला. तर एका भागाचे तुकडे सुमारे १०० मीटरपर्यंत जाऊन पडले. 

फिशटँकसह, खिडकीचे तावदाने फुटली 
सिलिंडरचास्फाेट झाल्यानंतर त्याचे काही तुकडे बाजूला राहणाऱ्या शिवाजी ताेताराम मराठे यांच्या घरात गेले. तसेच त्यांच्या घरातील फिश टँक, शाे-केस तसेच खिडकीचे तावदानाचे काच स्फाेटामुळे फुटले. तसेच घरातील फ्रीजसह काही वस्तूंचेही नुकसान झाले. 
 
 
 

अग्निशमन बंब, पोलिस दाखल 
रिक्षाच्या सिलिंडरचा स्फाेट झाल्यानंतर काही नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभाग, पाेलिसांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पाेलिस अाणि अग्निशमन िवभागाचा बंब त्या ठिकाणी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही मिनिटांतच अागीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. 
 
बातम्या आणखी आहेत...