आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद नसल्यामुळेच दादर एक्स्प्रेस झाली बंद, रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत मंथन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
भुसावळ - भुसावळ-दादर एक्स्प्रेस गेल्या वर्षी चालवण्यात अाली हाेती. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने ही एक्स्प्रेस बंद करण्यात आली. केवळ ५४ टक्के प्रवासी मिळत असल्याने ही गाडी बंद करण्याचा निर्णय मुख्यालयाने घेतला, अशी माहिती डीअारएम अार.के. यादव यांनी गुरूवारी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत दिली. त्यामुळे ही गाडी सुरू हाेणार नाही असे संकेत अाहेत. 
 
गुरूवारी दुपारी तीन वाजता डीअारएम कार्यालयात रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची बैठक झाली. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. परिक्षित बऱ्हाटे यांनी दादर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली. त्यावर डीआरएम यादव यांनी स्पष्टीकरण दिले. रमेश मकासरे यांनी रेल्वे गाड्यांमध्ये अस्वच्छता असल्याचा तर अजितसिंग बेहरा यांनी ‘मल्टीलेयर पार्किंग’चा मुद्दा मांडला. एडीअारएम अरूण धार्मिक, वाणिज्य व्यवस्थापक व्ही.पी. दहाट अन्य अधिकारी उपस्थित हाेते. 
 
रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत मंथन 
रेल्वे प्रवाशांना विविध सुविधा पुरवण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांवर चर्चा झाली. प्रवाशांना पिण्यासाठी थंड शुद्ध पाणी, विविध रेल्वे स्थानकावरील शेडची लांबी वाढवणे, रेल्वे स्थानकांवर प्रसाधनगृहे आदी बाबींवर बैठकीत चर्चा झाली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...