आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टाेअरेज सेंटरच्या माध्यमातून तालुकास्तरावर रक्तपुरवठा, गर्भवतींचा मृत्यू राेखण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव - अनेकदा ग्रामीण भागातील रुग्णाला रक्तासाठी थेट जळगावला धाव घ्यावी लागते. अशा परिस्थितीत अनेकदा रुग्ण दगावण्याची भीती असते. रक्त मिळाले नाही म्हणून काेणाचा मृत्यू हाेऊ नये यासाठी अाता तालुकापातळीवर स्टाेअरेज सेंटर उभारले जाणार अाहे. येत्या सहा महिन्यांत गाेळवलकर रक्तपेढीच्या माध्यमातून जिल्ह्यात तीन सेंटर सुरू हाेणार अाहेत.
 
या सेंटरमध्ये आॅटोमेटेड ‘नॅट’ तंत्रज्ञानाद्वारे चाचणी घेतलेले रक्त उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अाैरंगाबाद येथील दत्ताजी भाले रक्तपेढीचे वैद्यकीय संचालक डाॅ. महेंद्रसिंह चाैहान यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. 
 
अाैरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात कार्यरत दत्ताजी भाले रक्तपेढीचा महाराष्ट्र शासनाने ‘राज्यातील सर्वोत्कृष्ट रक्तपेढी’ म्हणून गौरव केला आहे. या रक्तपेढीचे वैद्यकीय संचालक डाॅ.महेंद्रसिंह चाैहान हे रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगावात अाले हाेते. या वेळी त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला.
 
एकाच वेळी अनेकांनी रक्तदान करून उपयाेग हाेत नाही, तर रक्तदात्यांची गरज ही ३६५ दिवस असते. त्यामुळे रक्तदान शिबिर घेताना रक्तपेढीच्या साेईचा दिवस पाहून नियाेजन करावे. यासाठी ‘डाेनर अाॅन काॅल’ ही संकल्पना राबवली जात असल्याचे डाॅ.चाैहान यांनी सांगितले. 
 
सुरक्षिततेसाठी ‘नॅट’ चाचणीला प्राधान्य 
दत्ताजी भाले रक्तपेढीने न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन तंत्रज्ञानाने (नॅट) रक्ताची चाचणी सुरू केली. आॅटोमेटेड ‘नॅट’ तंत्रज्ञान वापरणारी ही एकमेव रक्तपेढी आहे. ‘नॅट’ चाचणीत रक्ताच्या नमुन्यातून ‘प्लाझ्मा’ वेगळा काढला जातो.
 
हे जगातील उत्कृष्ट रक्त मानले जाते. ‘नॅट’च्या माध्यमातून हाेणाऱ्या चाचणीने वेळेचीही बचत हाेते. त्यात सुरक्षिततेची हमी असते. नागरिकांनीही रक्तदान हे रेकाॅर्डसाठी नव्हे, तर जीव वाचवण्यासाठी करण्याचे अावाहन डाॅ. चाैहानांनी केले. 
 
रक्तपेढी उभारण्यास एक काेटी रुपयांपर्यंत खर्च येत असताे. ग्रामीण भागात एवढा पैसा खर्च करणे परवडणारे नसते. अशा परिस्थितीत स्टाेअरेज सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची गरज भागवली जाणार अाहे.
 
गाेळवलकर रक्तपेढीत चाचणी केलेले रक्त स्टाेअरेज सेंटरमध्ये उपलब्ध करून दिले जाणार अाहे. येत्या सहा महिन्यांत रावेर, पाचाेरा जामनेर येथे स्टाेअरेज सेंटर उभारले जाणार अाहेत. तालुकास्तरावर छाेटी जागा, टेक्निशियन, डाॅक्टर चाेवीस तास वीजपुरवठा ही सुविधा उपलब्ध करून दिल्यास दत्ताजी भाले रक्तपेढीतर्फे स्टाेअरेज सेंटर सुरू करण्याची तयारी डाॅ. चाैहान यांनी दाखवली.
 
गर्भवती महिलांना प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासत असते. अनेकदा रक्तपुरवठा हाेऊ शकल्याने महिलांचा मृत्यूदेखील हाेत असताे. १०००मागे १३४ असे मृत्यूचे प्रमाण असून, हे प्रमाण १००पेक्षा कमीवर अाणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले अाहे.
 
यासाठी अाता नागरिकांना रक्तपेढीपर्यंत अाणता रक्तपेढी अाता गावपातळीपर्यंत पाेहाेचवण्याचे काम सुरू केले अाहे. डाॅ. अांबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे अाैरंगाबादमध्ये यादृष्टीने काम सुरू झाले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त पुरवले जात अाहे. ही सेवा जळगावात गाेळवलकर रक्तपेढीच्या माध्यमातून दिली जाणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...