आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत बिबट्याचे पिलू अाढळले, वाघूर धरण परिसरात कुत्र्यांनी मारल्याचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघूर धरण परिसरात बुधवारी आढळून आलेले मृत बिबट्याचे पिलू. - Divya Marathi
वाघूर धरण परिसरात बुधवारी आढळून आलेले मृत बिबट्याचे पिलू.
जळगाव - वाघूर धरण परिसरात ते महिने वय असलेल्या बिबट्याच्या पिलाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत बुधवारी आढळून आला. कुत्र्यांनी या पिलाला जखमी केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज डाॅक्टरांनी व्यक्त केला आहे. 
 
वाघूर धरणाच्या डाव्या बाजूला बुधवारी सकाळी काही मजुरांना ते महिन्यांचे बिबट्याचे पिलू मृतावस्थेत आढळून आले. या विषयी मजुरांनी वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनपाल एस. टी. भिलावे, बी. एन. पवार, वनरक्षक डी. ए. जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. हे पिलू कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन नंतर त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉ. महाजन यांनी व्यक्त केला आहे. पिलाच्या शरीरावर कुत्र्यांनी मारलेली नखे दातांचे व्रण होते. जागेवरच शव विच्छेदन करून पिलाचा मृतदेह जाळण्यात आला. वाघूर धरण परिसरात वन्य प्राण्यांचा अधिवास चांगला असल्यामुळे कुत्र्यांचे प्रमाणदेखील जास्त आहे. या पूर्वी मोकाट कुत्र्यांनी नीलगायींना जखमी केल्याच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची या भागात गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून करण्यात आली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...